कोरोनासारख्या महामारी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता : भगतसिंह कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 04:31 PM2020-11-03T16:31:08+5:302020-11-03T16:39:41+5:30

कोरोना महामारीच्या काळात आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित झालेे असून, या काळात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा यांसारख्या विविध पॅथींनीही एकत्रित केलेले काम कौतुकास्पद असले तरी कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात तंत्रशुद्ध संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना मिळण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

The need for research in the health sector for epidemic control like corona | कोरोनासारख्या महामारी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता : भगतसिंह कोश्यारी

कोरोनासारख्या महामारी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता : भगतसिंह कोश्यारी

Next
ठळक मुद्देकोरोना महामारीच्या काळात आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखितराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादनविद्यापीठाच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन

नाशिक : कोरोना महामारीच्या काळात आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित झालेे असून, या काळात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा यांसारख्या विविध पॅथींनीही एकत्रित केलेले काम कौतुकास्पद असले तरी कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात तंत्रशुद्ध संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना मिळण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.
विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकृत मुख्य प्रशासकीय इमारतीचे तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिककार्य मंत्री तथा कुलपती अमित देशमुख, डीएमईआरचे संचालक तात्याराव लहाने, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्र-कुलगुरू मोहन खामगावकर, कुलसचिव कालिदास चव्हाण उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, डॉक्टर आणि नर्सचे आरोग्यसेवेचे व्रत अवघड आहे. त्यापेक्षा शिक्षण घेणे अवघड असून, अशी ज्ञान ग्रहणाची शक्ती लाभलेल्यांसाठी पायाभूत सुविधांची पूर्तता होणे गरजेचे आहे. शिक्षण तर महत्त्वपूर्ण आहेच. पण वैद्यकीय शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व असून, त्यासाठी नेतृत्वाची भूमिका पार पाडताना योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  दरम्यान, कोरोनाला न घाबरता सामना करा, मात्र निष्काळजीपणा करू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, आरोग्य विद्यापीठाच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कौतुक करताना ते म्हणाले, बदलत्या परिस्थितीत स्वच्छ ऊर्जेचा स्त्रोत असलेल्या सौरऊर्जेला प्रोत्साहन देणे आवश्यक असून त्यादृष्टीने आरोग्य विद्यापीठाने टाकलेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: The need for research in the health sector for epidemic control like corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.