शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाची गरज की चुकांवर पांघरूण?

By admin | Updated: July 24, 2014 01:01 IST

मनसेची आक्रमकता : पक्षांतर्गत असमन्वय चव्हाट्यावर; निष्क्रियतेचे खापर राज्य सरकारवर

नाशिक : पालिकेत कामेच होत नाहीत, या विरोधकांच्या तक्रारींवर आज सत्तारूढ मनसेनेच आंदोलन करून शिक्कामोर्तब केले आहे. फरक एवढाच आहे की, त्यांनी या निष्क्रियतेचे खापर राज्य सरकारवर फोडले आहे. मनसेची सत्ता आल्यानंतर पालिकेत एकही भरीव काम झालेले नाही, असा प्रचार विरोधकांनी राज्यभर केला होता. त्याची पुनरावृत्ती आता होऊ नये यासाठी राज्य सरकारवर जबाबदारी लोटण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजकारण म्हणून तेही ठीक म्हटले तरी त्यानिमित्ताने पक्षातील असमन्वय आणि अपरिपक्वतादेखील चव्हाट्यावर आली.
महापालिकेत पूर्णवेळ आयुक्त नाही. पूर्णवेळ आयुक्ताची नियुक्ती व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार मागणी करण्यात आली. पण त्याचा उपयोग झाला नसल्याने मनसे आता आक्रमक झाली असली, तरी आंदोलन इतके विलंबाने सुचले हे आश्चर्यकारक आहे. गेल्याच आठवड्यात शिवसेनेने हा मुद्दा हाती घेऊन पालिकेच्या ज्या प्रवेशद्वारावर जेथे आंदोलन केले, त्याच पायऱ्यांवर आंदोलन करून मनसेने जणू सेनेची नक्कल केली. सेनाही अशी टीका करण्यास मोकळी झाली आहे.
राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करायचे तर त्यासाठी पालिकेचे प्रवेशद्वार ही योग्य जागा नव्हती. जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त हे शासनाचे प्रतिनिधी अधिकारी असल्याने तेथे आंदोलन सोयीचे झाले असते. तसे न झाल्याने जे मुळातच ‘प्रभारी’ आहेत त्या आयुक्तांकडेच पूर्णवेळ आयुक्त नियुक्त करण्याची मागणी करून काय होणार? त्यामुळेच आयुक्तांनी या निवेदनाचे मी काय करू असा आंदोलकांना केलेला प्रश्नच मनसेच्या अज्ञानावर प्रकाश टाकणारा होता. आयुक्तांच्या टीकेला महापौरांनी उत्तर देण्याच्या प्रकारामुळे तर महापौर वेगळे आणि मनसेचे नगरसेवक वेगळे आहेत, हे तितकेच स्पष्ट झाले.
विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन मनसेने सारवासारव केली असली, तरी एकंदरच यातून निष्पन्न काय झाले, असा प्रश्न निर्माण झाला. मनसेवर निष्क्रियतेचे ठपका ठेवणाऱ्यांना सांगण्यासाठी आयुक्त नाहीत हे कारण दाखवणारे हे कातडी बचाव आंदोलन होते इतकेच! (प्रतिनिधी)