शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घकालीन साखर निर्यात धोरणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:00 IST

यावर्षी साखरेचे बंपर उत्पादन झाल्याने या साखरेचे करायचे काय, असा प्रश्न केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्रालयासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच साखरेवरील सर्व निर्यात कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : यावर्षी साखरेचे बंपर उत्पादन झाल्याने या साखरेचे करायचे काय, असा प्रश्न केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्रालयासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच साखरेवरील सर्व निर्यात कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा दर आणि मागणीही कमी असल्याने हा निर्णय साखर उद्योगाला फारसा फलदायी ठरणार नसल्याचे मत साखर क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. देशातील साखरेचा साठा कमी करण्यासाठी निर्यात कर रद्द करण्यासोबत निर्यात अनुदान देण्याचीही आवश्यकता असून, कर रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलब जावणी दीर्घ कालावधीसाठी करण्याची गरज साखर उत्पादन क्षेत्रातून व्यक्त होते आहे. देशांतर्गत साखरेचे उत्पादन दरवर्षीपेक्षा सुमारे ६० ते ७० लाख टन जादा होणार असल्याने राष्ट्रीय सहकारी साखर संघ आणि इंडियन शुगर मिल असोसिएशन या दोन्ही सहकारी व खासगी संघांनी निर्यात कर हटविण्याची मागणी केली होती. विशेषत: साखरेवरील निर्यात कर रद्द करण्याबरोबर निर्यात कोटा, निर्यात अनुदान, बफर स्टॉक आणि साखर कारखान्यांच्या कर्जांची पुनर्बांधणी करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. २०१७-१८ च्या गळीत हंगामामध्ये एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे जाहीर केलेली एफआरपी उत्पादकांना कशी द्यायची, असा प्रश्न साखर कारखानदारांसमोर निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय पातळीवर दोन्ही संघटना सातत्याने मागण्यांचा पाठपुरावा करत होत्या. देशातील साखरेला मागणी वाढण्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये साखरेवरील आयात शुल्क शंभर टक्के करण्याचा निर्णय अन्न व पुरवठा मंत्रालयाने घेतला. पण तरीही साखरेच्या मागणीमध्ये वाढ झाली नाही. परिणामी साखरेच्या दरात प्रचंड प्रमाणात घसरण होऊ लागली. त्यामुळेच साखरेवरील वीस टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सद्यस्थितीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा दर प्रतिक्विंटल २१०० रु पये असल्याने या निर्णयाचा फारसा फायदा होणार नसल्याचे संकेत आहेत.निर्यात कर रद्द झाल्याने दिलासानाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड व गिरणा साखर कारखाने बंद पडलेले असून, रानवड व कादवा या सहकारी साखर कारखान्यांची स्थितीही नाजूक आहे. सध्या रानवड व कादवा-गोदा हे साखर कारखाने खासगी उद्योजकांकडून चालविले जात असले, तरी साखरेचे दर आणि शेतकऱ्यांना एफआरपीनुसार उसाचे दर देण्यासह अन्य खर्चांचा मेळ घालण्याचे सूत्र कारखान्यांना जुळविणे अडचणीचे झाले आहे. यात खासगी क्षेत्रातील द्वारकाधीश साखर कारखान्याची स्थिती चांगली आहे. मात्र, साखर कारखान्यांचा उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा वाढत चालला आहे. अशा स्थितीत साखरेचे उत्पादन वाढल्याने साखरेचे दर कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली असताना, सरकारने सर्व निर्यात कर रद्द केल्याने सध्यातरी साखर कारखान्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना निर्यात शुल्क कमी केले तरी त्याचा फारसा फायदा साखर उद्योगाला होणार नाही. यासाठी निर्यात अनुदान देऊन देशातील साखरेचा साठा कमी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा जाहीर केलेली एफआरपी देताना साखर कारखान्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांना वाचविण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.  - वसंतराव बाविस्कर, माजी व्यवस्थापकीय संचालक, नाशिक सहकारी साखर कारखाना

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने