नाशिक : शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिकांच्या रकमा मोठ्या असल्या तरी सादरीकरणासाठी मिळणारा निधी अत्यल्प असून, सादरीकरणाचा निधी सहा हजारहून दहा हजार रुपये करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी केले आहे.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ५८व्या राज्य हौशी मराठी नाट्य परिषदेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मध्यवर्ती नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक मानसी राणे, दीप चहांदे, श्रीराम धुमणे, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर, मीना वाघ आदी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर अंबिका चौक मित्रमंडळ व सामाजिक संस्था नाशिकतर्फे ‘प्रियांका आणि दोन चोर’ नाटकाचे सादर करण्यात आले. यात वैशाली देव यांनी प्रियांकाची तर हेमंत गव्हाणे व अमोल थोरात यांनी चोराची भूमिका रंगवली.
नाट्य सादरीकरणाचा निधी वाढविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:26 IST
शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिकांच्या रकमा मोठ्या असल्या तरी सादरीकरणासाठी मिळणारा निधी अत्यल्प असून, सादरीकरणाचा निधी सहा हजारहून दहा हजार रुपये करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी केले आहे.
नाट्य सादरीकरणाचा निधी वाढविण्याची गरज
ठळक मुद्देरवींद्र कदम : राज्य नाट्य स्पर्धेला प्रारंभ