तांब्यात अडकली मान; दूध पिणे पडले महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:32 IST2020-04-16T20:19:04+5:302020-04-17T00:32:04+5:30
बाळासाहेब कुमावत । लोकमत न्यूज नेटवर्क पाथरे : दूध पिण्यासाठी तांब्यात डोके घातल्यानंतर बोक्याचे डोके त्यात अडकल्याची घटना तालुक्यातील पाथरे येथे घडली. तरुणांनी प्रसंगावधान राखत एका बोक्याची तांब्यातून सुटका करून त्याचा जीव वाचविला.

तांब्यात अडकली मान; दूध पिणे पडले महाग
बाळासाहेब कुमावत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरे : दूध पिण्यासाठी तांब्यात डोके घातल्यानंतर बोक्याचे डोके त्यात अडकल्याची घटना तालुक्यातील पाथरे येथे घडली. तरुणांनी प्रसंगावधान राखत एका बोक्याची तांब्यातून सुटका करून त्याचा जीव वाचविला.
तरुणांनी बोक्याची मरणाच्या दारातून सुटका केली. येथील खासगी पशुवैद्य सतीश गुंजाळ, मकरंद गुंजाळ यांच्या जवळके रस्त्यावरील घराशेजारी सदर घटना घडली. एक बोका छोट्याशा तांब्यात दूध आहे असे समजून दूध पिण्यासाठी गेला. त्याने छोट्याशा तांब्यात मान घातली, पण त्यानंतर त्याने मान बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, परंतु त्या बोक्याला त्याची मान बाहेर काढता येत नव्हती. तांब्यातून मान बाहेर काढण्याचा हा प्रकार साधारण चार ते पाच तास चालू होता. बोका तांब्यातून सुटका करत असल्याचे सकाळी सतीश गुंजाळ यांनी प्रथम बघितले. हा प्रकार रात्री उशिरा घडला असावा कारण बोका थकला होता. बोक्याला तरुणांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु बोका उंच उड्या मारत होता आणि नखांनी ओरबाडीत होता. बोका काट्यांमध्ये इकडे तिकडे बेफान पळत होता. जिवाच्या आकांताने स्वैरवैर झालेल्या बोक्याला पकडणे अवघड झाले होते. त्याचा जीव गुदमरून धोक्यात आला होता. त्यामुळे सतीश गुंजाळ यांनी आपल्याशेजारी नवनाथ गुंजाळ, मंगेश गुंजाळ, संदीप रहाणे, मकरंद गुंजाळ यांना बोलावले. त्यांनी खूप प्रयत्नांनी त्यास पोत्यात पकडले.