दरवाढ विरोधात कळवण राष्ट्रवादीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:15 IST2021-05-18T04:15:27+5:302021-05-18T04:15:27+5:30

नायब तहसीलदार व्यंकटेश तुप्ते यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून दरवाढीचा एककलमी ...

NCP's statement against price hike | दरवाढ विरोधात कळवण राष्ट्रवादीचे निवेदन

दरवाढ विरोधात कळवण राष्ट्रवादीचे निवेदन

नायब तहसीलदार व्यंकटेश तुप्ते यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून दरवाढीचा एककलमी कार्यक्रम लावला असून, पेट्रोल,डिझेलसह शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या खतांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. ही दरवाढ अन्यायकारक असून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. सध्याच्या कोरोना काळातसुद्धा रात्रंदिवस शेतीत काबाडकष्ट करून शेतमाल मातीमोल भावात विकून हा जगाचा पोशिंदा आधीच कर्जबाजारी झालेला आहे. त्यामुळे या दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप पगार, संतोष देशमुख, रमेश वाघ, प्रकाश पगार उपस्थित होते.

Web Title: NCP's statement against price hike