इंधन दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:41 PM2018-01-31T23:41:20+5:302018-02-01T00:00:20+5:30

राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांमुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये झालेल्या भरमसाठ-वाढीचा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले.

 NCP's refusal of fuel hike | इंधन दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध

इंधन दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध

Next

सिन्नर : राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांमुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये झालेल्या भरमसाठ-वाढीचा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले.  गेल्या वर्षभरात घरगुती गॅसच्या दरात तब्बल १८ वेळा दरवाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ ही प्रत्येक दिवसामागे होत असताना सामान्य जनतेचे व शेतकºयांचे कंबरडे मोडले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. एका बाजूने देशाच्या विकासाचा दर सातत्याने कमी होत आहे, तर दुसºया बाजूला शेतकरी व कृषीवर आधारित उद्योग धंदे मोडकळीस आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर बाब शेतकºयांच्या व मजुरांच्या मुळावर उठलेली असून, ही अन्यायकारक दरवाढ त्वरित मागे घेऊन सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, नामदेव कोतवाल, डी.डी. गोर्डे, संदीप लोखंडे, दीपक लहामगे, नीलेश शिंदे, मेघा दराडे, कल्पना रेवगडे, अजय साळवे, सरला गायकवाड, प्रवीण जगताप, रमेश जाधव, वनिता सिंग, युनूस शेख, वामन पवार, मुख्तार पिंजारी, पवन जाधव, अर्जुन बर्डे, एम. डी. पवार, बाळासाहेब पवार यांच्यासह कार्यकते उपस्थित होते.

Web Title:  NCP's refusal of fuel hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.