सरकार पाडून दाखविण्याचे राष्ट्रवादीचे आव्हान
By Admin | Updated: July 17, 2015 00:50 IST2015-07-17T00:50:34+5:302015-07-17T00:50:45+5:30
सरकार पाडून दाखविण्याचे राष्ट्रवादीचे आव्हान

सरकार पाडून दाखविण्याचे राष्ट्रवादीचे आव्हान
नाशिक : सरकारात राहून शेतकऱ्यांचा सातबारा करता येत नसेल तर शिवसेनेने भाजपाचा पाठिंबा काढून घ्यावा, सरकार पडत असेल तर राष्ट्रवादी कधीही पाठिंबा देणार नाही असे सांगत या पक्षाचे प्रवक्ते आणि रायुकॉँचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.
पाटील यांनी पत्रकार परिषदेते शिवसेनवर टीका केली. सत्तेत सहभागी असून, शिवसेना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी केवळ मागणीच करते आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करू शकत नाही. दुसरीकडे भाजपाबरोबर राहून त्यांच्यावर सामनातून टीका करण्यापेक्षा सेनेने सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे ते म्हणाले. भाजपाला बहुमतासाठी आवश्यक ती संख्या मिळत नसताना त्यावेळी राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंंबा देण्याची तयारी दर्शविली होती.