राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

By Admin | Updated: August 7, 2014 01:59 IST2014-08-07T01:02:22+5:302014-08-07T01:59:41+5:30

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

NCP workers' haze | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

 

नाशिक : समवयस्क विद्यार्थिनीने नाव विचारून रॅगिंग केल्याचा आरोप करीत बुधवारी सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसशी व विशेष करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित तरुणांनी सातपूर औद्योगिक वसाहतीतील आयडिया आर्किटेक्चर महविद्यालयात धुडगूस घातला. लाठ्या-काठ्या व दगडफेकीने कार्यालयाच्या काचा फोडून खुली दहशत तर माजविलीच; पण महाविद्यालयातील कर्मचारी व प्राध्यापकांच्या नावे लाखोली वाहत यथेच्छ धुमाकूळ घातला.
ज्या विद्यार्थिनीवर रॅगिंग झाली अशी तक्रार आहे, ती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश चिटणीस दिलीप खैरे यांची कन्या आहे. पोलिसांनी मात्र दहा ते पंधरा अज्ञात तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल करून आपल्या मर्दुमकीचे प्रदर्शन घडविले. सोमवारपासून यासंदर्भातील वाद धुमसत होता. राष्ट्रवादीच्या एका आमदाराने व बड्या पदाधिकाऱ्यानेच या प्रकरणात लक्ष घातल्याने घटनेचे गांभीर्य वाढले होते. प्रकरण मिटले म्हणून महाविद्यालय व्यवस्थापन गाफील असतानाच सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडला.

Web Title: NCP workers' haze