राष्ट्रवादी, सेना, मनसेची निवडणूक तयारीत आघाडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST2021-09-21T04:17:04+5:302021-09-21T04:17:04+5:30
नाशिक महापालिकेत सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षात मात्र अजूनही सामसूम दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजीही डोके वर काढू ...

राष्ट्रवादी, सेना, मनसेची निवडणूक तयारीत आघाडी !
नाशिक महापालिकेत सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षात मात्र अजूनही सामसूम दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजीही डोके वर काढू लागली असून, जिल्ह्याचे प्रभारी जयकुमार रावल यांनी एक, दाेन वेळेस नाशिकला हजेरी लावून पक्षाच्या बैठका घेतल्या असल्या तरी, प्रभाग निहाय अजूनही कार्यकर्त्यांपर्यंत निवडणुकीला सामोरे जाण्याचा कार्यक्रम पोहोचलेला नाही. त्यातच अधून मधून शहराध्यक्ष बदलाचे वृत्त येत असल्यामुळे चलबिचल सुरू आहे. अशीच अवस्था काँग्रेसची असून, प्रदेश पदाधिकारी नेमणुकीवरून पक्षात निष्ठावंत विरूद्ध पदाधिकारी असा वाद सुरू झाला असल्याने निवडणुकीची तयारी फार लांबवरही नजरेस पडत नाही.
चौकट===
लहान पक्षही शर्यतीत
अपवाद वगळता प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत असतांना त्यांना टक्कर देण्यासाठी लहान सहान पक्षही महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. त्यात आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, माकप, भाकपा, शेकाप या डाव्या आघाडीतही बोलणी सुरू झाली आहे.