नायगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी चोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 17:54 IST2018-11-04T17:54:39+5:302018-11-04T17:54:55+5:30
नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जल वाहिनीतून मोठया प्रमाणावर होणारी पाणी चोरी होत असल्याचा प्रकार शनिवारी (दि.३) रोजी मध्यरात्री उघडकीस आला आहे.

नायगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी चोरी उघडकीस
नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जल वाहिनीतून मोठया प्रमाणावर होणारी पाणी चोरी होत असल्याचा प्रकार शनिवारी (दि.३) रोजी मध्यरात्री उघडकीस आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जायगाव व देशवंडी येथिल पाणीपुरवठा पाणीचोरीमुळे विस्कळीत होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना कृत्रीम पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.
नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा गेल्या दोन-तीन महिन्यापासून विस्कळीत झाला आहे. मोहदरी येथील जलशुध्दीकरण केंद्रातून ज्या मुख्य जलवाहीनीतून वडझिरे, जायगाव व देशवंडी या गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्याच जलवाहीनीतून मोठया प्रमाणात पाणी चोरी होत आहे. त्यामुळे जायगाव व देशवंडी येथील जलकुंभ वेळेवर भरले जात नाही. पाणी चोरीमुळे जलवाहीनीतून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे या दोन्ही गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या दुष्काळी परिस्थती निर्माण झाल्याने तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अशा टंचाईच्या काळात होणाऱ्या पाणी चोरीमुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान प्राधिकरणाच्या पाच-सहा कर्मचाºयांनी शनिवारी रात्री शोधमोहीम राबवली. जायगाव ते मोह पर्यंतच्या दहा ते बारा ठिकाणी होणारी पाणीचोरी उघडकीस आली आहे. अजुनही अनेक ठिकाणी पाणी चोरी होत असल्यामुळे या योजनेचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे बोलले जात आहे.