नक्षता ओस्तवाल शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 18:39 IST2019-07-04T18:38:41+5:302019-07-04T18:39:14+5:30

सटाणा : येथील किलबिल इंग्लिश मिडियम स्कूलच्या नक्षता ओस्तवाल या विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पुर्व प्राथमिक व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय ग्रामीण विभागाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्र मांक मिळविला. शाळेच्या इतर विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत उज्वल यश मिळविले.

 Naxalha Ostwal First in the scholarship examination | नक्षता ओस्तवाल शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम

नक्षता ओस्तवाल शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम

पाचवीतील सेजल खैरनार तर आठवीतील नक्षता ओस्तवाल, तेजल अहिरे, भव्य पटेल, अथर्व केल्हे व यश अहिरे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. शाळेने उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संगीता शुक्ल, वर्ग शिक्षक, विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक मंगेश शुक्ल,मुख्याध्यापक शुक्ल, दुरिया सैफी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Web Title:  Naxalha Ostwal First in the scholarship examination