शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सव यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 18:47 IST

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सव कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देबैठकीत निर्णय : पुजारी, सेवेकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सव कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.नवरात्र उत्सवात देवीची पुजाअर्चा व धार्मिक विधी पुजारी यांच्याकडूनच होणार असून मंदिरात घटस्थापना केली जाणार आहे. १७ आॅक्टोबरपासून यात्रोत्सवाला प्रारंभ होणार होता. परंतु, कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, तुळजापुर, त्र्यंबकेश्वर याठिकाणच्याही यात्रा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. गडावर नवरात्रोत्सवात पुजारी, देवीचे सेवेकरी यांनाच फक्त मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे तसेच पायी येणारे भाविक अथवा ज्योत नेण्यासाठी व कावडधारकांसाठी, तसेच कोजागिरी पौर्णिमेला तृतीय पंथियांनाही बंदी घातली असुन देवी दर्शनासाठी संपूर्ण मंदिर बंद असेल असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. बैठकीला कळवणचे तहसीलदार बंडू कापसे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, कळवणचे प्रांत अधिकारी विकास मीना, सप्तशृंगगड निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहांतोडे तसेच पोलिस उपअधीक्षक शर्मिला वालावलकर, पोलिस उपविभागीय अधिकारी भिमाशंकर ढोले, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, माजी उपसरपंच राजेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्ह्याच्या सीमा करणार सीलनंदुरबार, धुळे, मध्य प्रदेश, जळगाव व अन्य ठिकाणाहून काही भाविक कावड घेऊन निघाले असतील तर त्यांनी माघारी परतावे. त्यांनी आपल्या भागातील मंदिरातच पुजा करावी तसेच जिल्ह्याच्या सीमा सिल केल्या जाणार आहेत. जेणेकरून यात्रेसाठी कोणीही येणार नाही. नांदूरीच्या पायथ्यापासुनच बॅरीकेटस लावण्यात येणार आहे तसेच रडतोंडी घाटाच्या पायी मार्गाला व गणपतीकडील वणीच्या पायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यंदा ध्वजाची मिरवणूकही साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे.या वर्षी नवरात्र उत्सव यात्रा होणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारे भाविकांना सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या जाणार नाहीत. याच बरोबर गडावर येण्यासाठी प्रवेश बंदी असेल. परंतु जे स्थानिक नागरीक आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी पासेस दिले जातील. त्यामध्ये कुठलीही प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी नसेल.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारीकोरोना या साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देवी भक्तांची सप्तशृंगी देवीवर जितकी नितांत श्रद्धा आहे तितकीच त्यांच्या जीवीताची योग्य ती काळजी घेणे महत्वाचे असल्याने उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . दैनंदिन पुजाअर्चा, आरती वगळता इतर कोणतेही धार्मिक उपक्र म,मोफत अन्न दान,निवास व्यवस्था उपलब्ध नसेल. तसेच भाविकांसाठी सोशल मिडीयाचा वापर करून युट्युब, फेसबुकवरून आॅनलाईन दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे.- सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट.

 

टॅग्स :Navratriनवरात्रीsaptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर