शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नवरात्रोत्सवामुळे फुल बाजारात सुगंधाचा दरवळ; दसऱ्यासाठी मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 14:34 IST

गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सावात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहे. पितृपक्षाच्या समाप्तीनंतर बुधपासून (दि.१०) प्रारंभ झाला असून नवरोत्रोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासूनच झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून दसऱ्याच्या पाश्वभूमीवर यात आणखी वाढ झाल्याने झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १५० ते १६० रुपये जाळीने विकला जात आहे. 

ठळक मुद्देनाशिक शेतीला दुष्काळाच्या झळा फुलांची आवक घटल्याने भाव वधारले दसऱ्यांच्या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी वाढली

नाशिक : गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सावात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहे. पितृपक्षाच्या समाप्तीनंतर बुधपासून (दि.१०) प्रारंभ झाला असून नवरोत्रोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासूनच झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून  दसऱ्याच्या पाश्वभूमीवर यात आणखी वाढ झाल्याने झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १५० ते १६० रुपये जाळीने विकला जात आहे. नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावटीसाठी फुले हा अतिशय उत्तम पर्याय असल्याने वेगवेगळ्या फुलांचा आरास सजावटीसाठी अधिकाधिक वापर केला जातो. यंदाही हे चित्र कायम असून, फुलबाजार गर्दीने गजबजून गेला आहे. दसऱ्याच्या दिवशी तर घरातील देवदेवतांसह, शस्त्रपूजन व वाहने व गृहसजावटीसाठीही फुलांचा वापर होत असल्याने फुलांना मागणी वाढली आहे. यात सर्वाधिक मागणी झेंडूच्या फुलांना असून अन्य सुगंधी फुलांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात कापडाची कुत्रिम फुले उपलब्ध असली तरी भारतीय संस्कृतीतील विविध सण उत्सवांमध्ये खºया फुलांची सजावट विशेष आकर्षक ठरते. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपांत ही फुले उत्सवात आणखी सुंदरता भरतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे फुलबाजारात नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात फुलांच्या खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. नवरात्रोत्सवात विविधरंगी फुलांच्या सुगंधामुळे बाजारातही उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे. नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद, आजगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडी परिसरांतून प्रामुख्याने फुलांची आवक होत असून दिंडोरी आणि सिन्नर परिसरातील फुलशेतीला यावर्षी दुष्काळाच्या झळा बसल्याने फुलांचे भाव वधारल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

असे आहेत फुलांचे दर
फुलांचे प्रकार /प्रमाण ( प्रती किलो/जाळी/शेकडा चे दर )

झेंडू  *जाळी-

      *शेकडा-

१५०ते १६० रुपये,

 ५०ते ६०  रुपये,

मोगरा (प्रतिकिलो)

 ६०० ते ८०० रुपये
शेवंती (प्रतिकिलो) ६०  ते ८०  रुपये
 जरबेरा (प्रति १० नग)५० ते ६० रुपये
निशिगंधा (प्रतिकिलो)१००  ते १२०रुपये
*गुलाब  (प्रति १० नग)*साधा गुलाब (प्रति १० नग)

८० ते ९० रुपये

१५ ते २५ रुपये

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण घटल्याने यावर्षी झेंडू ३० ते ४० रुपयांनी महागला आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यानी सुरुवातीला मोठ्या आकाराचा झेंडू बाजारात विकला असून नवरात्रीच्या शेवटच्या दोन दिवसात सर्व झेंडू बाजारात आणण्याची शक्यता असल्याने पुरेशा प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. संदीप शिंदे, अध्यक्ष, फु लविक्रेता संघटना, फुलबाजार नाशिक. 

टॅग्स :Navratriनवरात्रीMarketबाजारconsumerग्राहकFarmerशेतकरी