शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नाशिकच्या मुंबईनाका, गंगापूर पोलीस ठाण्यांना लवकरच मिळणार हक्काची जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:39 IST

मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांना वाढीव एफएसआय देण्यात आला असून, पोलीस क र्मचा-यांसाठी किमान ५०० फुटांचे घर असावे हे सरकारने मान्य केले आहे, असेते म्हणाले.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयाकडून 'एमपीआयडी' कायद्याचा योग्य वापर पोलीस कर्मचा-यांसाठी किमान ५०० फुटांचे घर असावे हे सरकारने मान्य केले पोलिसांचे गृहनिर्माण प्रकल्प सोयी-सुविधांनुसार उभारणी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंबईनाका, गंगापूर पोलीस ठाण्यांसाठी लवकरच हक्काची जागा गृहमंत्रालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पोलीस वसाहतीमधील समस्या आणि मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी गृहविभाग सातत्याने सकारात्मक प्रयत्न क रत आहे, असे प्रतिपादन गृह व शहर विकास खात्याचे मंत्री रणजित पाटील यांनी केले.पोलीस मुख्यालय वसाहतीमध्ये आयोजित विविध विकासकामांच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले,  पोलिसांचे गृहनिर्माण प्रकल्प सोयी-सुविधांनुसार उभारणी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यात पंधरा वर्षांच्या तुलनेत त्याचा आलेख या सरकारच्या काळात वाढला आहे. पोलिसांच्या जुन्या वसाहतींमध्ये मूलभूत सोयी-सुविधा देण्याचाही सतत प्रयत्न केला जात असून, त्यासाठी धोरणात्मक निर्णयांमध्ये बदलही केले आहे. कारण शहराच्या व राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असणा-या पोलीस दलासाठी त्याची खरी गरज आहे, याची जाणीव गृह विभागाला आहे.विधीमंडळात फरांदे यांच्याकडून शहरातील या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या जागेसंदर्भात लक्षवेधी मांडली जात होती. याबाबत लवकरच त्यादृष्टीने सरकारने पावले उचलली आहे. पुढील अधिवेशनात त्यांना या लक्षवेधी मांडण्याची संधी गृह खाते देणार नाही. महापालिका, गृह विभागाचे संयुक्त प्रयत्नाने जागा दोन्ही पोलीस ठाण्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या स्वतंत्र इमारतीचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे पाटील यांनी यावेळी आश्वासन दिले. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांना वाढीव एफएसआय देण्यात आला असून, पोलीस क र्मचा-यांसाठी किमान ५०० फुटांचे घर असावे हे सरकारने मान्य केले आहे, असेते म्हणाले.

‘नो हॉँकिंग डे’ संकल्पना राज्यभर राबविणारनाशिक पोलीस आयुक्तालयाकडून ‘नो हॉँकिग डे’ संकल्पना राज्यभर राबविण्यासाठी गृह विभाग प्रयत्नशील आहे. ही चांगली संकल्पना ध्वनी प्रदूषणावर मात करणारी आहे. मोठी शहरे व मोठी होऊ पाहणाºया शहरांमध्ये लोकजागृतीसाठी अशी संकल्पना पूरक ठरते. एमपीआयडी कायद्याचा योग्य वापर पोलीस आयुक्तालयाकडून आर्थिक गुन्ह्यांची उकल व संबंधित ठेवीदारांना मिळवून दिलेला लाभ कौतुकास्पद व अभिमानास्पद असल्याचे पाटील म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसGovernmentसरकारnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय