पाणी विसर्गाच्या पार्श्वभूमीवर दारणा धरणाला पोलीस छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:09 IST2018-10-29T18:08:28+5:302018-10-29T18:09:28+5:30
घोटी : मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाने दारणा धरणातून अखेर जायकवाडी साठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दारणा धरणातून सुमारे पाच आणि त्यानंतर सहा हजार क्यूसेस प्रति वेगाने तर मुकणे धरणातूनही १००० हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती दारणा धरणाचे अभियंता एस बी पाटील यांनी दिली.

दारणा समूहातून दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात एकूण २.४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
घोटी : मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाने दारणा धरणातून अखेर जायकवाडी साठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दारणा धरणातून सुमारे पाच आणि त्यानंतर सहा हजार क्यूसेस प्रति वेगाने तर मुकणे धरणातूनही १००० हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती दारणा धरणाचे अभियंता एस बी पाटील यांनी दिली.
पाणी सोडण्याची रंगीत तालीम तसेच इतर तयारीसाठी सोमवारी दिवसभर पाटील यांचेसह पारबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी धरणावर तळ ठोकून आहेत. पोलीस यंत्रणेचा कडक पहारा असून घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, वाडीवºहेचे सहाय्यक पोलिस शांताराम देशमुख व सुमारे पन्नास कर्मचारी येथे हजर आहेत. सोमवारी दुपारी राज्य गुप्तचर विभागाच्या सहा. उपायुक्त श्रीमती एस. सी. कमलाकर यांनी धरणावर येऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. भावली, भाम धरणातून दारणात गुरु वारपासून पाण्याचा विसर्ग सुरू असून सोमवारी दारणा धरणात सुमारे ९३ टक्के पाणी साठा आहे. दारणा धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून नदी काठी थांबू नये असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील दारणा समूहातून दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात एकूण २.४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांत असलेल्या पाणी साठ्यातून ९ टीएमसी पाणी आता जायकवाडी साठी सोडू नये म्हणून नाशिक व नगर जिल्ह्यातील शेतकºयांनी व लोकप्रतिनिधींनी यास जोरदार विरोध केला.