निरोगी जीवनासाठी निसर्गोपचार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:42 AM2019-11-19T00:42:16+5:302019-11-19T00:42:40+5:30

सध्याच्या ताणतणावाच्या काळात विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी व आजार उद्भवत असताना अशा व्याधींपासून कायमस्वरूपी मुक्तीसह निरोगी राहण्यासाठी पर्यावरणाच्या सान्निध्यात निरायम जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केले.

 Natural therapy is essential for a healthy life | निरोगी जीवनासाठी निसर्गोपचार आवश्यक

निरोगी जीवनासाठी निसर्गोपचार आवश्यक

Next

नाशिक : सध्याच्या ताणतणावाच्या काळात विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी व आजार उद्भवत असताना अशा व्याधींपासून कायमस्वरूपी मुक्तीसह निरोगी राहण्यासाठी पर्यावरणाच्या सान्निध्यात निरायम जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केले. तसेच नॅचरोपॅथीच्या (निसर्गोपचार) उपचारांतून निरोगी आरोग्य राहण्यास मदत होत असून, नॅचरोपॅथी व योगासनांमुळे आरोग्य सुधारण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
शिवगोरक्ष योगपीठ आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी असोसिएशन यांच्यातर्फे सोमवारी (दि. १८) संयुक्तरीत्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त आयोजित परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण, शिवगोरक्ष योगपीठाचे धर्माचार्य भगवान महाराज माउली, महामंडलेश्वर शिवानंद महाराज, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अजिंक्य वाघ, प्रज्ञा पाटील आदींसह नॅशनल व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवगोरक्ष योगपीठाचे प्रमुख शिवानंद महाराज यांनी बीएनवायसी हा नॅचरोपॅथी व योगा विषयीच्या अभ्यासक्रमाचा कालावधी कमी करून साडेचार वर्षांऐवजी हा अभ्यासक्रम दोन वर्षांचाच करण्याची मागणी केली. या परिषदेत उत्तर महाराष्ट्रातील नॅचरोपॅथी डॉक्टर, सर्व समन्वयक, योगशिक्षक यांच्यासह विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले होते. दिवसभरात या परिषदेत नॅचरोपॅथीच्या विविध विषयांवर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

Web Title:  Natural therapy is essential for a healthy life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.