शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बँक विलिनीकरण, खासगीकरणास विरोध कर्मचारी संघटनांचा देशव्यापी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 13:44 IST

ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया  संघटनांच्या माध्यमातून मंगळवारी (दि.२२) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला असून या माध्यमातून संघटनेच्या नाशिक शाखेतील कर्मचाऱ्यांनी बँक विलीनीकरण व खासगीकरणाला विरोध केला आहे.

ठळक मुद्देविलिनीकरण प्रक्रियेला बँक कर्मचाऱ्यांचा विरोध बीआयबीईए , बीईएफआय संघटनांचा देशव्यापी संप बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

नाशिक : केंद्र सरकारने देशातील बँकांचे विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली असून या प्रक्रियेला देशभरातील विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांसह बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवित एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपाच्या माध्यमातून नाशिकमध्ये टिळकपथ येथील बँकेच्या शहर कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त करण्यासाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया  संघटनांच्या माध्यमातून मंगळवारी (दि.२२) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला असून या माध्यमातून संघटनेच्या नाशिक शाखेतील कर्मचाऱ्यांनी बँक विलीनीकरण व खासगीकरणाला विरोध केला आहे. बँक कर्मचाऱ्यांनी या संपाच्या माध्यमातून बँकांमधील कर्मचाऱ्यांची नोकरी असुरक्षीत झाल्याचे सांगत सरकारकडून वारंवार बँकींग क्षेत्रातील नोकऱ्यांवर हल्ले होत असल्याचा अरोप करतानाच सरकारने बँकींग क्षेत्रातील नोकरीच्या सुरक्षिततेवरील हल्ले थांबविण्याची मागणी केली. तसेच या क्षेत्रातील रिक्त जागांवर तत्काळ नोकर भरती करून सेवा शुल्कात सातत्याने होणारी वाढ थांबविण्याची आणि थकीत व एनपीए झालेल्या कर्जाची वसुली करण्याची मागणी बीआयबीईए आणि बीईएफआय या संघटनांनी केली आहे. या आंदोलनात बँक कृती समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ महाराष्ट्रचे सचीव शिरीष धनक यांच्यासह के. एफ. देशमूख, अदित्य तूपे, अशोक डोईफोडे, मनोज जाधव, मंगेश रोकडे, संतोष कागळे आदींनी सहभाग घेत सरकारविरोधात घोषणाबाजी करून बँकांच्या विलनाीकरणाला जोरदार विरोध केला.

 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकEmployeeकर्मचारीStrikeसंपBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र