राष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:23 IST2018-10-26T00:23:25+5:302018-10-26T00:23:55+5:30

देवळा : प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा त्याला कृतीची जोड आंदोलनाच्या मार्गाने दिली तर निश्चितच यश मिळेल याची महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले. देवळा येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महिला संघटन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Nationalist Women's Congress meeting | राष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक

देवळा येथे राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना प्रेरणा बलकवडे. समवेत उषा बच्छाव, नूतन अहेर, पंडित निकम, यशवंत शिरसाठ आदी.

ठळक मुद्देराष्ट्रवादी महिला काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर

देवळा : प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा त्याला कृतीची जोड आंदोलनाच्या मार्गाने दिली तर निश्चितच यश मिळेल याची महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले. देवळा येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महिला संघटन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सभापती केशरबाई अहिरे, जि.प. सदस्य नूतन अहेर, प्रांतिक सदस्या लीना अहेर, तालुकाध्यक्ष पंडित निकम, जि.प. सदस्य यशवंत शिरसाठ, डॉ. कृष्णा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. उपाध्यक्षपदी वैशाली खोंडे यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Nationalist Women's Congress meeting