राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुखास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 00:27 IST2016-07-11T00:24:48+5:302016-07-11T00:27:11+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुखास अटक

Nationalist Congress Party chief arrested | राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुखास अटक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुखास अटक

नाशिक : पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून कुरापत काढून एका युवकासह तरुणीस बंदुकीचा धाक दाखवून सोन्याची साखळी बळजबरीने खेचून नेल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागप्रमुख अमोल नाईक यांना पोलिसांनी अटक केली आहे़ १ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी पाच संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील शाहूनगरमधील अनिल मिश्रा यांनी काही संशयितांविरोधात ३० जून रोजी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती़ यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीचा पश्चिम विभागप्रमुख अमोल नाईकसह प्रमोद घोटेकर, यास्मीन खाटीक, बाळा मेहेंदळे, भूषण थोरात या संशयितांनी नाशिकरोड येथील करी लिव्हज् हॉटेलच्या मागे अनिल यांना गाठले़ या ठिकाणी चॉपर व बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण करीत असताना एका तरुणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिचा विनयभंग करून तिच्या गळ्यातील सोन साखळी खेचली़
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच संशयितांना अटक करण्यात आली होती़ या संशयितांकडे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर प्रमुख सूत्रधार अमोल नाईक असल्याचे समोर आले़ पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, भगत यांनी सापळा रचून नाईक यास पवननगर येथून अटक केली़ या प्रकरणामुळे राजकीय गुंडगिरीचा विषय समोर आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Nationalist Congress Party chief arrested