शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आंदोलन : ‘त्या’ काकू आता वाढत्या महागाईवर का बोलत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 16:29 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जाहिरातीतून सांगणा-या ‘बहुत हुवी महंगाई की मार..’ असे म्हणणा-या ‘त्या’ काकू आता कुठे गेल्या? पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅसचे दरवाढ होत असताना आता काकू जाहिरातीतून का बोलत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उपस्थित करत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सत्ताधारी सरकारच्या विरोधात बुधवारी (दि.३१) जोरदार आंदोलन करण्यात आले.पेट्रोल, डिझेल, ...

ठळक मुद्देसरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही मोटारीत डिझेल, पेट्रोलसारखे इंधन भरणे परवडणारे नाही

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जाहिरातीतून सांगणा-या ‘बहुत हुवी महंगाई की मार..’ असे म्हणणा-या ‘त्या’ काकू आता कुठे गेल्या? पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅसचे दरवाढ होत असताना आता काकू जाहिरातीतून का बोलत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उपस्थित करत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सत्ताधारी सरकारच्या विरोधात बुधवारी (दि.३१) जोरदार आंदोलन करण्यात आले.पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यासारख्या इंधनाच्या होणा-या भरमसाठ दरवाढीमुळे राज्यातील नव्हे तर देशाची जनता त्रस्त झाली आहे; मात्र सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही. सातत्याने पेट्रोल, डिझेलची भाववाढ केली जात आहे यामुळे जनता वेठीस धरण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी निवेदनातून करण्यात आला. आंदोलनात ढकलगाडीवर ठेवण्यात आलेली दुचाकी लक्षवेधी ठरली.भाजप-शिवसेना युती सरकारने राज्यातील इंधन दरवाढ नियंत्रणात आणावी, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. काही दिवसांपुर्वी शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलन करुन राज्य सरकारला घरचा आहेर देण्यात आला होता. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने काढलेल्या या मोर्चाद्वारे शिवसेनेने हस्तक्षेप करावा, आणि इंधन दरवाढ त्वरित कमी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्ताधारी भाजपा सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, सोमनाथ खताळे, जिल्हा परिषदेच्या सभापती अर्पणा खोसकर, प्रेरणा बलकवडे, पुरूषोत्तम कडलग, अंबादास खैरे, नंदन भास्करे आदिंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.मोटारीला बांधला दोरखंडइंधनाच्या होणा-या भरमसाठ दरवाढीमुळे मोटारीत डिझेल, पेट्रोलसारखे इंधन भरणे परवडणारे नाही, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोटार उभी करुन तीला दोरखंड बांधून ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोटारीला बांधलेला दोर दुतर्फा उभे राहून ओढत भाजपा सरकार व वाढती महागाईविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा