कसबे सुकेणे जैन स्थानकाला राष्ट्रीय अध्यक्षांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:06 IST2019-09-23T14:06:09+5:302019-09-23T14:06:22+5:30
कसबे सुकेणे : येथील सखल जैन स्थानकास जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा यांनी भेट देऊन सुरु असलेल्या विविध उपक्र मांचे कौतुक केले.

कसबे सुकेणे जैन स्थानकाला राष्ट्रीय अध्यक्षांची भेट
कसबे सुकेणे : येथील सखल जैन स्थानकास जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा यांनी भेट देऊन सुरु असलेल्या विविध उपक्र मांचे कौतुक केले. कसबे सुकेणे शहरात जैन समाज बांधवांचे स्थानक आहे. या स्थानकात चालू असलेल्या चातुर्मास मधीू तपश्या व होत असलेल्या विविध कार्यक्र माची माहिती चोपडा यांनी घेतली. महाश्वेताजी म.सा. यांचे दर्शन घेऊन कसबे सुकेणे येथे धार्मिक उपक्रम निश्चितच कौतूकास्पद असल्याचे सांगून जैन श्रावक संघाचे व चातुर्मास कमिटीचे कौतुक केले. यावेळी अध्यक्ष ललित गांधी, महामंत्री आनंद गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी नितीन गांधी, निलेश पोकरणा, दिलीप कटारिया, संजय गांधी, रतीलाल गांधी, दगडू गांधी, चंपालाल गुंदेचा ,सतीशलाल गांधी, रमेशलाल पोकरणा, अशोकलाल गांधी आदी उपस्थित होते.