National parties favor voters the most | राष्टÑीय पक्षांनाच मतदारांची सर्वाधिक पसंती

राष्टÑीय पक्षांनाच मतदारांची सर्वाधिक पसंती

ठळक मुद्देप्रादेशिक पक्ष दुसऱ्या स्थानावर : अन्य प्रांतातील प्रादेशिक पक्ष प्रभावहीन

नाशिक : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे मागे वळून पाहिले तर आजवर राष्टÑीय पक्षांच्याच झोळीत मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकल्याचा इतिहास आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्ष दुसºया स्थानावर आहेत. महाराष्टÑात अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही शिरकाव करण्याचा प्रयत्न केला; परंतु, ते प्रभाव दाखवू शकलेले नाहीत. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सहा राष्टÑीय पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी ६५.७७ टक्के इतकी होती. त्या तुलनेत प्रादेशिक पक्षांना २२.५० टक्के मते मिळविता आली होती, तर अन्य प्रांतातील राजकीय पक्षांना अवघे १.१५ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. महाराष्टÑात प्रादेशिक पक्षांकडे अजूनही मतदार पूर्णपणे एकहाती सत्ता सोपान देऊ शकलेले नाही.
महाराष्टÑात झालेल्या गेल्या चार विधानसभा निवडणुकांचा धांडोळा घेतला असता, १९९९मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्टÑीय पक्ष असलेल्या काँग्रेस, भाजप, बसपा, माकप, भाकप, जनता दल सेक्यूलर आणि जनता दल युनायटेड या राजकीय पक्षांना ४४.५० टक्के मते मिळाली होती. त्याखालोखाल प्रादेशिक पक्षांना ४१.३५ टक्के मते घेता आली. त्यावेळी प्रादेशिक पक्षांमध्ये राष्टÑवादी आणि शिवसेनेचा समावेश होता. त्यात राष्टÑवादीने २२.६६ टक्के, तर शिवसेनेने १७.३३ टक्के मते घेतली होती. यावेळी अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांना ४.६७ टक्के तर अपक्षांना ९.४९ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्टÑीय पक्षांचा आलेख चढता राहिला आणि त्यांनी ५८.२४ टक्के मते घेतली. त्याखालोखाल प्रादेशिक पक्षांना १९.९७ टक्के तर अन्य प्रांतातील राजकीय पक्षांना १.७८ टक्के मते घेता आली. अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांना ५.९७ टक्के तर अपक्षांना १४.९६ टक्के मते मिळाली होती. २००९च्या निवडणुकीत राष्टÑीय पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत घट होऊन त्यांना ५४.५० टक्के मते मिळाली. प्रादेशिक पक्षांना १६.२६ टक्के, तर अन्य प्रांतातील पक्षांना ०.९९ टक्के मते मिळाली. अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी १२.७५ टक्के तर अपक्षांनी १५.५० टक्के मते मिळविली होती. गेल्या चार निवडणुकींमध्ये मतदारांनी राष्ट्रीय पक्षांवरच सर्वाधिक भरवसा टाकलेला दिसून येतो.
अन्य प्रांतातील पक्षांची बोळवण
अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही महाराष्टÑात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काहींचा चंचुप्रवेशच झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर यश मिळविता आलेले नाही. १९९९च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने २ जागा जिंकल्या होत्या, तर अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांनी ११ जागा घेतल्या होत्या. २००४च्या निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाला यश मिळविता आलेले नाही. त्या तुलनेत अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांनी १० जागा जिंकल्या होत्या. २००९च्या निवडणुकीतही समाजवादी पक्षाने ४ जागा जिंकत आपला दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी तब्बल २५ जागा जिंकल्या होत्या, तर अपक्षांची संख्याही २४ इतकी होती. २०१४च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीला एक तर एमआयएमला २ जागा जिंकता आल्या होत्या. अमान्यताप्राप्त पक्षांनी ८ तर ७ अपक्ष उमेदवारांनी विधानसभेत प्रवेश केला होता.
बसपाची पाटी कोरीच
गेल्या चार निवडणुकींमध्ये मायावती यांच्या बसपाने सर्वाधिक जागा लढल्या; परंतु एकही उमेदवार विधानसभेची पायरी चढू शकलेला नाही. १९९९ मध्ये बसपाने ८३ जागा, २००४ मध्ये २७२ जागा, २००९ मध्ये २८१ जागा, तर २०१४ मध्ये २८० जागा लढल्या होत्या. विशेष म्हणजे प्रादेशिक पक्ष असलेल्या व गावोगावी शाखा असलेल्या शिवसेनेला अद्याप एवढे उमेदवार देता आलेले नाहीत. हीच परिस्थिती भाकपचीही आहे. गेल्या चार निवडणुकीत भाकपने उमेदवार दिले; परंतु त्यांच्या पदरीही अपयशच पडले आहे.

Web Title: National parties favor voters the most

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.