नेमिनाथ जैन विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:06 IST2020-12-24T22:29:03+5:302020-12-25T01:06:32+5:30
चांदवड : येथील नेमिनाथ जैन विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.

चांदवड येथील नेमिनाथ जैन विद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी प्राचार्य डॉ. संगीता बाफना, संदीप समदडिया, दत्ता ठाकरे, जी.डी. खैरनार, सुताणे आदी.
ठळक मुद्देराष्ट्रीय गणित दिवसाचे महत्त्व पटवून दिले.
चांदवड : येथील नेमिनाथ जैन विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. शिक्षक,शिक्षकेतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाफना यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेट मीडियाच्या माध्यमातून श्रीनिवास रामानुजन यांचा जीवनपट सांगून राष्ट्रीय गणित दिवसाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी उपप्राचार्य एस. यू. समदडिया, पर्यवेक्षक एम. टी. सोनी उपस्थित होते. गणित विभागप्रमुख जी. डी. खैरनार यांनी सूत्रसंचालन केले, तर ए. यू. सोनवणे यांनी आभार मानले.