शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राष्ट्रीय किसान महासंघाचा 1 जूनपासून देशव्यापी शेतकरी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 18:34 IST

सरसकट कर्जमाफी व शेतीलमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून या संपाच्या शेवटच्या दिवशी १० जूनरोजी संपात सहभागी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार असल्याचा विश्वास संपाच्या राष्ट्रीय कोअर कमिटीचे सदस्य संदीप गिड्डे यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे१ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप

नाशिक : सरसकट कर्जमाफी व शेतीलमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून या संपाच्या शेवटच्या दिवशी १० जूनरोजी संपात सहभागी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार असल्याचा विश्वास संपाच्या राष्ट्रीय कोअर कमिटीचे सदस्य संदीप गिड्डे यांनी व्यक्त केला आहे.नाशिकमधील हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (दि.२८)पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गिड्डे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन करताना यावेळी होणारा देशव्यापी संप पूर्णपणे गनिमी कावा पद्धतीने केला जाणार असल्याचे सांगितले. या संपादरम्यान १ जून पासून शहरातील दूध व भाजीपाला पुरवठा रोखला जाणार असून संपकाळात शहरातूनही काही खरेदी केली जाणार नाही. शेतकरी भाजीपाला बाजार समित्यांमध्ये न नेता थेट ग्राहकांना ६० रुपये प्रतिकिलो दराने तसेच दूध डेअरीमध्ये न नेता गावातच किंवा तालुक्याच्या ठिकाणी ५० रुपये लिटरप्रमाणे विकू शकतात असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गेल्यावेळी महाराष्ट्रात झालेल्या राज्यव्यापी संपात अनेक मागण्या राज्यसरकारच्या अखत्यारीतील नव्हत्या,त्यामुळे यावेळी देशव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागण्या मान्य करवून घेण्यासाठी लढा उभारण्यात येत आहे. या आंदोलनात देशभरातील २२ राज्यांतून शेतकरी सहभागी होणार आहे. जम्मू काश्मिर ते केरळपर्यंत शेतकऱ्यांनी केलेले हे पहिलेच आंदोलन असून राष्ट्रीय किसान महासंघाच्या १३० व किसान एकता मंचच्या ६० अशा १७० संघटना या देशव्यापी लढ्यात उतरणार असल्याचे गिड्डे यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनराष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचातर्फे पुकारण्यात येणार संपाविषयी व शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी शेतकरी संपाचे नेते संदीप गिड्डे व शंकर दरेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतीमालाचे कवडीमोल बाजारभाव, लहरी हवामान, शेतीविरोधी सरकारी धोरण यामुळे देशातील शेती उद्योग पूर्णपणे धोक्यात आला आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास देशातील शेतकऱ्यांचे अस्तित्वच संपूण जाण्याची भिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांला वाचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह देशबरातील शेतकरी संप करणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :agitationआंदोलनnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी