मानसोपचार तज्ज्ञांची उद्यापासून राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:12 IST2019-04-26T01:12:36+5:302019-04-26T01:12:59+5:30

इंडियन सायकियॅट्रीक सोसायटीच्या पश्चिम भारत शाखेच्या वतीने शनिवार, दि़ २७ पासून शहरात मानसोपचार तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ़ उमेश नागापूरकर आणि संयोजक डॉ़ हेमंत सोननीस यांनी पत्रकार परिषदेत दिली़

 National Council of Psychiatrist from tomorrow | मानसोपचार तज्ज्ञांची उद्यापासून राष्ट्रीय परिषद

मानसोपचार तज्ज्ञांची उद्यापासून राष्ट्रीय परिषद

नाशिक : इंडियन सायकियॅट्रीक सोसायटीच्या पश्चिम भारत शाखेच्या वतीने शनिवार, दि़ २७ पासून शहरात मानसोपचार तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ़ उमेश नागापूरकर आणि संयोजक डॉ़ हेमंत सोननीस यांनी पत्रकार परिषदेत दिली़
शनिवारपासून दोन दिवस हॉटेल एमराल्ड पार्क येथे सदर परिषद होणार आहे़ परिषदेचे उद्घाटन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते होणार आहे़ यावेळी इंडियन सायकियॅट्रीक सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ़ मृगेश वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे़ सोसायटीचे पश्चिम शाखेचे पदाधिकारी डॉ़ राजेश धुमे, डॉ़ दीपक राठोड, डॉ़ अशिष श्रीवास्तव, डॉ़ हेमल शाह हेदेखील उपस्थित राहणार आहे़ परिषदेत महाराष्ट्रासह गुजरात व गोवा राज्यांतून अनेक नामवंत डॉक्टरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत़ या कार्यक्रमांचे आयोजन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ़ बी़ एस़ व्ही़ प्रसाद, डॉ़ शिरीष सुळे आणि डॉ़ जयंत ढाके यांनी केले आहे़

Web Title:  National Council of Psychiatrist from tomorrow