अध्यक्ष निवडणुकीसाठी राष्टÑवादी-सेना सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:34 IST2019-12-21T00:33:26+5:302019-12-21T00:34:39+5:30
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेस सरसावली असून, शुक्रवारी दोन्ही पक्षांनी आपापल्या सदस्यांची स्वतंत्र बैठक घेऊन मते जाणून घेतली. दोन्ही बैठकांमध्ये महाविकास आघाडी होणार असल्याचे सदस्यांना सांगण्यात आले असले तरी, जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे, अशी भावना राष्टÑवादीच्या काही सदस्यांनी व्यक्त केली.

अध्यक्ष निवडणुकीसाठी राष्टÑवादी-सेना सरसावली
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेस सरसावली असून, शुक्रवारी दोन्ही पक्षांनी आपापल्या सदस्यांची स्वतंत्र बैठक घेऊन मते जाणून घेतली. दोन्ही बैठकांमध्ये महाविकास आघाडी होणार असल्याचे सदस्यांना सांगण्यात आले असले तरी, जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे, अशी भावना राष्टÑवादीच्या काही सदस्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पुढच्या आठवड्यात कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक दि. २ जानेवारी रोजी होण्याचे संकेत मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यांची राष्टÑवादी भवन येथे बैठक बोलावून पक्षाचे बलाबल जाणून घेतले त्याचबरोबर पोट निवडणुकीत दोन अपक्ष निवडून आल्याने त्यांची भूमिका काय असेल त्याची चाचपणी केली. नुकतेच निवडून आलेले खेडगाव गटातील भास्कर भगरे हे या बैठकीस उपस्थित होते, मात्र गीतांजली पवार या बैठकीत आल्या नाहीत. यावेळी भुजबळ यांनी सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या. पदाधिकाऱ्यांची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असून, कोण कोण इच्छुक आहेत. याची माहितीही घेतली. त्यावेळी अनेक सदस्यांनी पक्ष घेईल त्या निर्णयाला बांधिल राहू, असे सांगितले. तर काहींनी महाविकास आघाडी सत्तेवर येणार असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आता राष्टÑवादीला मिळावे, अशी मागणी केली. शिवसेनेने पावणेतीन वर्षे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवले होते, उर्वरित काळ राष्टÑवादीला द्यावा, अशी भावनाही बोलून दाखविली. पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या संदर्भात लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.
भुजबळ, राऊत घेणार अंतिम निर्णय
शिवसेनेच्या सदस्यांची बैठक संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी शासकीय विश्रामगृहावर घेतली. त्यातही पक्षाची सदस्य संख्या, सध्या कोणत्या पक्षाकडे सभापतिपद आहे याची माहिती त्यांनी घेतली व महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. सोमवारनंतर छगन भुजबळ व संजय राऊत हे एकत्र बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील व तो सर्वांना मान्य करावा, असे आवाहन त्यांनी केले.