आंतरराष्टय सौंदर्य स्पर्धेत नाशिकचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:36 IST2019-01-30T00:35:57+5:302019-01-30T00:36:37+5:30
दुबई येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान झालेल्या महिलांच्या सौदर्य स्पर्धेत नाशिकच्या सुषमा पवार आणि स्वाती पाटील यांनी सौंदर्याचा किताब पटकाविला.

आंतरराष्टय सौंदर्य स्पर्धेत नाशिकचा झेंडा
नाशिक : दुबई येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान झालेल्या महिलांच्या सौदर्य स्पर्धेत नाशिकच्या सुषमा पवार आणि स्वाती पाटील यांनी सौंदर्याचा किताब पटकाविला. या स्पर्धेत भारतातील ३२ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. ‘माइलस्टोन मिस व मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०१९’ या स्पर्धेत सुषमा पवार यांनी क्लासिक प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला तर ‘व्हिवर्स चॉईस अवॉर्ड’ किताबाच्या मानकरी ठरल्या नाशिकच्याच स्वाती जितेंद्र पाटील. त्यांनी कर्वी क्विन प्रकारात प्रथमक क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे ‘रोल मॉडेल’ प्रकारातही त्यांनी विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत आंतराष्टÑीय पातळीवरील अनेक नामवंत सौदर्यवतींनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
सुषमा पवार या सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार येथे कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता अनिल पवार यांच्या पत्नी असून
स्वाती पाटील या जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत.