शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

शहरात टप्प्याटप्प्याने पावसाच्या सलामीमुळे नाशिककरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:38 IST

अधूनमधून पावसाची उपनगरीय परिसरात तुरळक हजेरी होती; मात्र शनिवारपासून पावसाने उपनगरीय परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी पावसाने वर्दी दिली. रविवारी दुपारी बारा वाजेपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाले आणि थंड वाराही सुटला. क्षणार्धात टपोºया थेंबासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

नाशिक : पावसाने विश्रांतीनंतर रविवारी (दि.१०) दमदार सलामी दिली. भाद्रपदचे ऊन तापू लागल्यामुळे वातावरणात उष्माही जाणवत होता. कमाल तपमानाने तिशी ओलांडली आहे. अशा वातावरणात पावसाने दुपारपासून शहरासह उपनगरीय परिसरात टप्प्याटप्प्याने दिलेल्या सलामीमुळे नाशिककरांना दिलासा मिळाला.गणेशोत्सवाच्या अखेरच्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून पावसाची उपनगरीय परिसरात तुरळक हजेरी होती; मात्र शनिवारपासून पावसाने उपनगरीय परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी पावसाने वर्दी दिली. रविवारी दुपारी बारा वाजेपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाले आणि थंड वाराही सुटला. क्षणार्धात टपोºया थेंबासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाथर्डी, वडाळागाव, अशोकामार्ग, डीजीपीनगर, भाभानगर, जुने नाशिकसह तिडके कॉलनी परिसरात मुसळधार पाऊस झाला; मात्र टिळकवाडी, शरणपूररोड, सीबीएस, पंचवटी, नाशिकरोड, मेरी, म्हसरूळ भागात कडक ऊन पडलेले होते. दुपारी तीन वाजेपासून मात्र या कोरड्या परिसरातही पावसाला दमदार सुरुवात झाली. साडेचार वाजता पंचवटी परिसराला पावसाने झोडपले तर संध्याकाळी साडेपाच वाजेपासून सिडको,जेलरोडमध्येही जोरदार पाऊस सुरू झाला.कमाल तपमान ३३ अंशांवरचमागील चार दिवसांपासून तीस अंशांच्या जवळपास स्थिरावणारा कमाल तपमानाचा पारा रविवारी मात्र ३३.२ अंशांपर्यंत सरकला. रविवारी दिवसभर ढगाळ हवामान असल्यामुळे उष्मा जाणवत होता, तसेच वाºयाचा वेगही अत्यंत मंदावलेला राहिला. दुपारनंतर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. एकूणच दिवसभर पावसाची सुरू असलेली सलामी आणि उघडीप यामुळे तपमानात उष्मा कायम राहिला.

ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटशहरात पावसाची दिवसभर अल्प उघडीप अन् मुसळधार वर्षाव ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुरू होता. ढगांच्या गडगडाटाने होणाºया या पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे थेंब टपोरे असल्याचे जाणवत होते. कमी वेळेत वेगाने टपोºया थेंबांच्या वर्षावामुळे रस्त्यावरील वाहनेही दिसत नव्हती. वाहनचालकांकडून दिवे सुरू करून वाहतूक केली जात होती.