सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने गुलाबी थंडीत नाशिककरांची दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:53 PM2018-01-13T14:53:01+5:302018-01-13T15:00:41+5:30

नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील विविध उद्योग, कंपन्यांनी एकत्र येत सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने ‘नाशिक रन’ आयोजित केले. या रनमध्ये शेकडो अबालवृध्द नाशिककर एकत्र आले.

Nasikkar's race for pink nuggets for the purpose of social integration | सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने गुलाबी थंडीत नाशिककरांची दौड

सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने गुलाबी थंडीत नाशिककरांची दौड

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप , धावपटूंना आॅलिम्पिकच्या तयारीसाठी तीन लाखांना निधी या रनमध्ये शेकडो अबालवृध्द नाशिककर एकत्र आले

नाशिक : मैत्री-सदभावना जपण्याच्या हेतूने भल्या पहाटे शेकडो नाशिककर एकत्र जमले. शहारातील महात्मानगर मैदानावर एकत्र आलेल्या नाशिककरांची सकाळ आज उगवली ती झुम्बा नृत्याने. ‘नाशिक रन’च्या निमित्ताने जमलेल्या शेकडो नाशिककरांनी ढगाळ वातावरणात दौड लगावली.


नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील विविध उद्योग, कंपन्यांनी एकत्र येत सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने ‘नाशिक रन’ आयोजित केले. या रनमध्ये शेकडो अबालवृध्द नाशिककर एकत्र आले. महात्मानगर मैदानापासून दौडला प्रारंभ करण्यात आला. महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, भारताचे आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडला प्रारंभ करण्यात आला. महात्मानगर ते भोसला अशा या दौडमध्ये महिला, मुले, मुली, ज्येष्ठ अशा सर्वच वयोगटातील नाशिककरांचा उत्स्फूर्त सहभाग पहावयास मिळाला.


प्रारंभी ‘झुम्बा’चा वॉर्मअप नाशिककरांनी करत मैदानावर ठेका धरला. विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नाशिक रन ला सुरूवात झाली. नाशिककरांनी उत्साहात एक धाव मैत्री-सद्भावनेसाठी घेऊन सामाजिक संदेश दिला. यावेळी सहभागी नाशिककरांना पांढरा-निळा रंगाचा टी-शर्ट संयोजकांच्या वतीने देण्यात आला होता.


दरम्यान, धावपटूंना आॅलिम्पिकच्या तयारीसाठी कविता राऊत, किसन तडवी यांच्याकडे तीन लाखांना निधी देण्यात आला. एकूण एक कोटी रुपयांचा निधी नाशिक रन संस्थेच्या वतीने दिला जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष एच.एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष एच. बी. थोंटेश, सचिव अनिल दैठणकरराजाराम कासार, विश्वस्थ अविनाश चिंतावर, मुकुंद भट, अतुल खानापूरकर, संदीप पांडे, प्रबळ रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती प्राप्त व्हावी, या उद्देशाने सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.

Web Title: Nasikkar's race for pink nuggets for the purpose of social integration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.