नाशिक-पळसन बस अद्यापही अनियमित; प्रवाशांची गैरसोय
By Admin | Updated: May 13, 2014 00:43 IST2014-05-12T16:40:12+5:302014-05-13T00:43:59+5:30
सुरगाणा- जुन्या सीबीएसमधून सकाळच्या वेळी सुटणार्या नाशिक-पळसन बसच्या वेळेत कोणतीही सुधारणा न होता या ना त्या कारणाने तास दीड तास उशिरा सुटणे सुरूच असून, त्यामुळे मात्र सदर बसच्या भरवशावर राहणार्या प्रवाशांना मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. ही बस वेळेत सोडण्याकडे कुणीतरी लक्ष देईल काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नाशिक-पळसन बस अद्यापही अनियमित; प्रवाशांची गैरसोय
सुरगाणा- जुन्या सीबीएसमधून सकाळच्या वेळी सुटणार्या नाशिक-पळसन बसच्या वेळेत कोणतीही सुधारणा न होता या ना त्या कारणाने तास दीड तास उशिरा सुटणे सुरूच असून, त्यामुळे मात्र सदर बसच्या भरवशावर राहणार्या प्रवाशांना मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. ही बस वेळेत सोडण्याकडे कुणीतरी लक्ष देईल काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.
जुन्या सिबीएसमधून नाशिक आगाराची नाशिक-पळसन ही बस सुटण्याची वेळ सकाळी ६.३० वाजेची असूनही या बसला कधी वाहक नाही, तर कधी चालक नाही अशा विविध कारणांमुळे ही बस कधीही वेळेत निघत नाही. नाशिकहून दिंडोरी, वणी, हरणटेकडी, सुरगाणा, अलंगुण, पळसनकडे जाणारे असंख्य प्रवासी वाहनाने प्रवास करण्याचे टाळून या एस.टी.च्या भरवशावर थांबून प्रतीक्षा करीत असतात. परंतु प्रचंड वेळ होऊनही ही नाशिक-पळसन एस.टी. येतच नाही. त्यामुळे नाईलाजाने अन्य वाहनाने इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला जातो. एस.टी.चा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास असे विरुदावली मिरवणार्या एसटीत सुखाचा प्रवास उभे राहून का होईना; पण तो प्रवास करण्यासाठी नाशिक-पळसन एस.टी.मात्र वेळेत येतच नाही. सदर एस.टी.जुन्या सीबीएसमधून वेळेत सोडण्यासाठी संबंधित एस.टी.चे अधिकारी लक्ष देतील काय असा प्रश्न प्रवासीवर्गाकडून उपस्थित केला जात असून, आतातरी ही बस वेळेत सोडावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
---