नाशिक गारठले

By Admin | Updated: December 23, 2015 22:39 IST2015-12-23T22:36:38+5:302015-12-23T22:39:26+5:30

हुडहुडी वाढली : शहराचा पारा ६ अंशांपर्यंत घसरला

Nasik Garetele | नाशिक गारठले

नाशिक गारठले

उत्तर भारतात आलेल्या शीत लाटेमुळे शहराच्या किमान तपमानात मोठी घट झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मंगळवारी शहराचा पारा ७.४ अंशापर्यंत घसरला होता; मात्र बुधवारी (दि. २३) पारा थेट ६ अंशावर गेल्याने शहर अधिकच थंड झाले.
शहराच्या किमान तपमानाचा हा मोसमातील नीचांक असून, राज्यभरात सर्वांत कमी तपमान नाशिकलाच नोंदवण्यात आले. काही दिवसांपासून शहराचे किमान तपमान १२ ते १४ अंशांवर स्थिर होते; मात्र आज एकाच दिवसात तपमानात तब्बल सात अंशांनी घट झाली.
यापूर्वी चालू मोसमात २० नोव्हेंबर रोजी शहरात ११.५, तर ६ डिसेंबर रोजी ११.६ इतक्या किमान तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी प्रथमच तपमानाचा पारा ६ अंशांपर्यंत घसरला.

Web Title: Nasik Garetele

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.