शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

नाशिकला खतप्रकल्प पूर्णक्षमतेने कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:51 AM

रोज सुमारे पन्नास टन खताची निर्मिती

ठळक मुद्देधूळखात पडलेल्या मशिनरी सुरूरोज सुमारे पन्नास टन खताची निर्मिती

नाशिक : महापालिकेच्या वतीने पाथर्डीफाटा येथे सुरू करण्यात आलेल्या खत प्रकल्पावरील बंद अवस्थेत धूळखात पडून असलेल्या मशिनरी सुरू करण्यात आल्याने खतप्रकल्प हा पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून, दररोज सुमारे पन्नास टन खत तयार केले जात असल्याची माहिती नाशिक वेस्ट मॅनेजमेंटचे संचालक कर्नल सुरेश रेगे यांनी दिली. महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये हा खतप्रकल्प नाशिक वेस्ट मॅनेजमेंटला चालविण्यासाठी दिला. यावेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने पाथर्डीफाटा पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. अशा परिस्थितीत वेस्ट मॅनेजमेंटने या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून, धूळखात पडून असलेली मशिनरी व यंत्रसामग्री दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आली. यात काही जुन्या वाहनांची दुरुस्ती आणि काही नवीन उपकरणे खरेदी करण्यात आली. कार्यान्वित करण्यात आलेल्या बायोगॅस संयंत्रात ओला सेंद्रिय कचरा वेगळा करून ट्रिटमेंट प्लॅन्टची श्रेणी सुधारित करण्यात आली. नाले स्वच्छ व दुरुस्त करण्यात आले. याबरोबरच पंधरा वर्षांपासून खतप्रकल्पावरील चार कचऱ्याच्या ढिगाºयांपैकी दोन ढिगारे नाशिक वेस्ट मॅनेजमेंटने एका वर्षात हलविले. उन्हाळ्यात कचºयाला आग लागू नये यासाठी सदर कचरा मातीने झाकण्यात आला आहे. घनकचरा २०१६ नियमानुसार डंपसाइटचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार असून, माती आणि भूजल दूषित होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. पूर्वी मृत प्राण्यांमुळे परिसरात दुर्गंधी होत असे. आता मृत प्राण्यांची ज्वलन दाहिनीमध्ये विल्हेवाट लावण्यात येते. याबरोबर प्लॅस्टिकचे वर्गीकरण करून प्रक्रियाद्वारे इंधन निर्मिती केली जाते व त्यापासून तयार होणारे ज्वलनशील इंधन हे डिझेलच्या जागी वापरता येत असल्याचेही कर्नल रेगे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरणdumpingकचरा