नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा समारोप
By Admin | Updated: February 13, 2015 01:07 IST2015-02-13T01:07:17+5:302015-02-13T01:07:44+5:30
नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा समारोप

नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा समारोप
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवून नाशिक तालुक्याने सर्वसाधारण विजेतेपद राखले आहे. गेल्या दहा वर्षांनंतर नाशिकला हे सर्वसाधारण विजेतेपद मिळविता आले आहे. अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत काल (दि.१२) सायंकाळी पुरस्कार वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी मैदानावर या स्पर्धा खेळविण्यात आल्या. वकृत्व, चित्रकला, चारशे मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, वैयक्तिक गायन, समूह गायन, खो-खो, कबड्डी आदि क्रीडा व सांस्कृतिक प्रकारात सर्वाधिक पदके मिळवून नाशिक तालुक्याने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. यावेळी अध्यक्ष चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती उषा बच्छाव, किरण थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी केले. यावेळी पंचायत समिती सभापती मंदाबाई निकम, उपसभापती अनिल ढिकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले, गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी आदि उपस्थित होते. आभार विस्तार अधिकारी भीमराव गरड यांनी मानले.(प्रतिनिधी)