शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

आॅनलाईन बदली प्रक्रियेतील ‘त्या’ शिक्षकांची सुनावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 8:31 PM

: शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत संवर्ग-१ आणि संगर्व-२ मध्ये प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेणाऱ्या १६६ शिक्षकांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्यासामोर सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी आठ तालुक्यांमधील शिक्षकांची सुनावणी पुर्ण करण्यात आली. शनिवारी उर्वरित तालुक्यांमध्ये शिक्षकांना चौकशीला सामोरे ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद: चौकशीनंतर शिक्षकांमध्ये मात्र नाराजी शनिवारी उर्वरित शिक्षकांना चौकशीला सामोरे जावे लागणार

: शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत संवर्ग-१ आणि संगर्व-२ मध्ये प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेणाऱ्या १६६ शिक्षकांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्यासामोर सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी आठ तालुक्यांमधील शिक्षकांची सुनावणी पुर्ण करण्यात आली. शनिवारी उर्वरित तालुक्यांमध्ये शिक्षकांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.      शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत अनेक शिक्षकांनी चुकीची माहिती  भरून १६६ शिक्षकांनी सोयीच्या बदल्या मिळविल्याचे पडताळणीत समोर आल्याने या शिक्षकांची सुनावणी करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात झालेल्या सुनावणीत बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शिक्षकांची गीते यांनी हजेरी घेतली. या शिक्षकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या कागदपत्रांच्या सतत्येविषयी तसेच बदलीअंतरातील तांत्रिक बाबी पडताळून पाहिल्याचे समजते. सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत सुनावणी प्रक्रिया सुरू होती. उद्या शनिवारी (दि.२१) रोजी उर्वरित तालुक्यातील शिक्षकांची सुनावणी होणार आहे.     या सुनावणीसाठी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर तसेच गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंता, वैद्यकीय विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, या सुनावणीत  दोषींवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्यावर एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्याबरोबरच त्यांच्यावर पाच वर्ष अवघड क्षेत्रात काम करण्याची सक्तीची कारवाई होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तविली आहे.      --इन्फो-सुनावणीनंतर शिक्षकांची नाराजीसुनावणीसाठी जिल्हा परिषदेत आलेल्या शिक्षकांनी मात्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सुनावणी कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांनी बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी दिली नसल्याचा आरोप करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक कागदपत्रांना खोटे ठरवत त्यांनी जास्त बोलल्यास अपात्र केले जाईल असा दम भरल्याचे काही शिक्षकांनी खासगीत बोलून दाखविले. सुनावणीत त्यांनी केवळ प्रत्यक्ष बोलविले असले तरी बोलण्याची संधी दिली नसल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.  

 

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षकTransferबदली