सावधान, मांजातूनही उतरू शकतो वीजप्रवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:43 IST2020-01-14T15:41:19+5:302020-01-14T15:43:14+5:30
नाशिक : मकरसंक्रातीनिमित्त पतंगबाजी करण्याचा पारंपरिक उत्सव साजरा केला जात असला तरी या उत्सवाचे स्वरुप बदलल्याने त्याचा फटका पतंग ...

सावधान, मांजातूनही उतरू शकतो वीजप्रवाह
नाशिक: मकरसंक्रातीनिमित्त पतंगबाजी करण्याचा पारंपरिक उत्सव साजरा केला जात असला तरी या उत्सवाचे स्वरुप बदलल्याने त्याचा फटका पतंग उडविणाऱ्या तरुणांना, नागकिांना आणि पक्ष्यांनाही होत आहे. या सणाच्या काळात पतंगाच्या मांजामुळे अपघात घडण्याचे प्रमाण मोठे असून विशेषता: वीजेच्या तारांजवळी मांजा आणि पतंग काढतांना अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महावितरणे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
शहर, ग्रामीण भागात वीज वितरणाच्या लघु ं ाणि उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. अनेकदा पतंग उडवितांना किंवा काटलेले पतंग वीजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात असे पतंग आणि मांजा काढण्याच्या प्रयत्नात अपघात होतात आणि अनेकांच्या जीवावर बेतते. विशेष म्हणजे बाजारात असलेल्या धातुमिश्रित आणि रासयनिक युक्त मांजांमधून विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता अधिक असते. असा मांजा प्रवाहीत विद्युत तारांमधून काढण्याचा प्रयत्न केल्यास वीजेचा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्युत तारांवर अडकलेले पतंग आणि मांजा काढण्याचा प्रयत्न केल्यास अपघात होऊ शकतो अशी शक्यता महावितरणने वर्तविली आहे.