पंचवटी : पंचवटी पोलिस ठाण्यात करण्यात करण्यात आलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी व मानव उत्थान मंचच्या कार्यकर्त्यानी पोलीस ठाणो परिणास मेणबत्ती श्रद्धांजली केली. आंदोलनाची परवानगी घेतली नसल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मात्र विरोध जुगारून कार्यकत्र्यानी कत्तल झालेल्या वृक्षांना श्रद्धांजली अर्पण केली. पंचवटी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी वृक्षांची कत्तल करून फांद्या छाटण्यात आल्या होत्या. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पोलीस ठाणो आवारातील वृक्ष बुंध्यापर्यंत तोडल्याने मनपासमोर आंदोलन केले होते. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येऊनही कारवाई होत नसल्याने कार्यकत्र्यानी पोलीस आणि मनपाचा निषेधही नोंदविला होता . महापालिकेकडून कारवाई होत नसल्यचे पाहून वृक्षप्रेमी नागरिकांनी पोलीस ठाण्यात तोडलेल्या वृक्षांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्र म हाती घेतला होता. सायंकाळी पर्यावरण प्रेमी, मानव उत्थान मंचचे पदाधिकारी हातात मेणबत्ती घेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी पोलीस ठाणो परिसरात आले असता पोलिसांनी आंदोलनाला परवानगी घेतली नसल्याने कार्यक्रम करण्यासा मज्जाव केला. मात्र पोलिसांच्या विरोधानला न जुमानता पर्यावरण प्रेमींनी विरोध श्रद्धांजली वाहिली.यावेळी जगबीरिसंग, योगेश कापसे, गिरीश उगले, सुमित शर्मा, भारती जाधव, हेमंत जाधव, विनायक येवले, शैलेंद्र पगारे, सतीश कांबळे,अनिल फोकने, मनीष बाविस्कर, हेमल लढानी, धनश्री कुलकर्णी, पुष्पा धपोला आदी उपस्थित होते .
पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर वृक्षांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 21:00 IST