शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे बॅँक खाते नसल्याने रखडली शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:38 IST

नाशिक : माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे बॅँक खाते आॅनलाइन भरण्याची जबाबदारी पंचायत समितीची असतानाही जिल्ह्यातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचे बॅँक खाते अद्यापही आॅनलाइन जोडले गेले नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजानेवारीचा अल्टिमेटम देण्यात येऊनही या कामाला अपेक्षित गती नाही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याचा धोका

नाशिक : माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे बॅँक खाते आॅनलाइन भरण्याची जबाबदारी पंचायत समितीची असतानाही जिल्ह्यातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचे बॅँक खाते अद्यापही आॅनलाइन जोडले गेले नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात पंचायत समित्यांना जानेवारीचा अल्टिमेटम देण्यात येऊनही या कामाला अपेक्षित गती प्राप्त झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शालेय शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या  माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचा निकाल आॅनलाइन काढून तो विद्यार्थ्यांना कळविण्याची जबाबदार गटशिक्षणाधिकारी आणि शहरात शिक्षण मंडळाची आहे. विद्यार्थ्यांना प्राप्त शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी संबंधितांनी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्याची माहिती आॅनलाइन भरण्याचे काम तालुका पातळीवर पंचायत समिती आणि शहरात शिक्षण मंडळांनी करणे अपेक्षित आहे. मात्र माध्यमिक शिक्षण विभागाने वारंवार सूचना करूनही अद्याप सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचे बॅँक खाते शिष्यवृत्तीच्या संकेतस्थळावर भरण्यात आलेले नाही.संबंधितानी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांची माहिती भरून तत्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना पंचायत समिती आणि शिक्षण मंडळाला करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही संबंधित विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्याची माहिती भरण्यात आलेली नाही. यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलवरून माहिती भरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्यावेळी माहिती भरणे शक्य झाले नाही, मात्र या यंत्रणेतील त्रुटींमुळे ‘एज्युकेशन स्कॉलरशिप डॉट कॉम’ या संकेतस्थळावर माहिती भरण्याचे आवाहन पंचायत समिती आणि शिक्षण मंडळाला करण्यात आलेले आहे. मात्र या कामात अक्षम्य दिरंगाई सुरू असून या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे एकूणच चित्र आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाeducationशैक्षणिक