शिवसेना नेपालच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:41 IST2018-08-01T16:40:43+5:302018-08-01T16:41:59+5:30
शिवसेनेच्या भगवा सप्ताहनिमित्ताने शिवसेना नेपालच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना नेपालच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव
नाशिक : शिवसेनेच्या भगवा सप्ताहनिमित्ताने शिवसेना नेपालच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नेपाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल सेंच्युरी, संपर्क प्रमुख अशोक नेपाली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महानगपर प्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, मुंबईचे लोगी सुनार, उपमहापनगर प्रमुख राजाभाऊ शिरसाठ आदि उपस्थित होते. याप्रसंगी सशू महत, सुजिता देशमुख, निर्मुलकुमार नेपाली, पवन बुद्धप्रसाद रिजाल, सुशांत प्रधान, गिरी चेतना दिगंबर, मानसी ईश्वर, साक्षी बोहरा, थापा सुरजन दिलबहादूर, मिनल क्षत्रीय, आदित्य देवदास, सुमित क्षत्रीय, जिग्नेश खरे, अविनाश बागूल, आकाश बोराडे, राकेश अय्यर, एर्श्वय थापा, आसावरी गोडसे, आदित्य गाडेकर, शुभम पवार, अंजना सोनार, पल्लवी राव, आकांक्षा मुर्तडक, शिवांजली मुर्तडक आदिंचा सत्कार करण्यात आला. शिवसेना नेपाली शाखेचे कार्यकारिणी सदस्य तसेच नेपाली महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.