नाशिक :ठाणे जिल्ह्यात शहापूरच्या माहुली किल्ला परिसरात असलेला वजीर सुळका सर करुन नाशिकच्या दृष्टीबाधित सागर बोडकेने नवीन विश्वविक्रमाला गवसनी घातली आहे. वजीर सुळका हा ९० अंशातील सरळ व २८० फूट उंची असलेला हा सुळका नेहमीच गिर्यारोहकांना साद घालत असतो. सागरने याआधी १२८ दिवसांत २१ वेळा कळसुबाई शिखर सर करुन जागतिक विक्रम केला होता. जिथं सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो तिथं या वजीर सुळक्याची चढाई करण्याची कल्पनाही करणं अशक्य आहे. गिर्यारोहण क्षेत्रात सर्वात आव्हान देणारा सुळका म्हणजे ‘वजीर सुळका’ याला ओळखले जाते. पॉइंट ब्रेक एडवेंचर समूहाने हि मोहीम हाती घेतली होती. दत्ता साळुंके, चेतन शिंदे , तुषार पाटील, मनोज वाघ, दीप नाचणकर व वेदांत व्यापारी यांनी सागरला मदत केली.सागरने यावर्षी २६ जानेवारी ते २ जून या १२८ दिवसात २१ वेळा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करून ‘वंडर बुल आॅफ रेकोर्ड, लंडन’ व ‘ब्राव्हो बुक आॅफ रेकोर्ड, फ्रांस’ यामध्ये जागतिक विक्र म नोंदविला होता. वजीर सुळक्यावर ‘पॉर्इंट ब्रेक अॅडव्हेंचर’ या समुहाच्या गिर्यारोहकांनी ३ दिवसात ५० सभासदांनी आरोहण केले असून आजपर्यंत एकढया मोठया संखेनी वजीर सुळका आरोहण करणारी ही पहिली गिर्यारोहक संस्था ठरली आहे. यामध्ये बाल गिर्यारोहक प्रणव कापडणीस, वय ११, अक्षत पाटील, वय १३, श्रद्धा मोरे ,वय १५, नेहाल डेंगाणे तर ज्येष्ठ गिर्यारोहक देशीराम चव्हाण, प्रमोद आहिरे, ऐश्वर्या आहिरे, प्रज्ञा देशमुख, अबोली जयदीप पाटील, इला बार्शीलिया, अर्चना गडधे यांनी सागर सोबत वजीर सुळका आरोहण पूर्ण केले. लवकरच जागतिक विक्र म प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्र म आयोजित केला जाणार असल्याचे गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे यांनी सांगितले .
नाशिकच्या दृष्टीबाधित सागरने रचला नवीन विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:05 IST
ठाणे जिल्ह्यात शहापूरच्या माहुली किल्ला परिसरात असलेला वजीर सुळका सर करुन नाशिकच्या दृष्टीबाधित सागर बोडकेने नवीन विश्वविक्रमाला गवसनी घातली आहे.
नाशिकच्या दृष्टीबाधित सागरने रचला नवीन विश्वविक्रम
ठळक मुद्देवजीर सुळका सर करुन दृष्टीबाधित सागर बोडकेने नवीन विश्वविक्रमाला गवसनी १२८ दिवसांत २१ वेळा कळसुबाई शिखर सर करुन जागतिक विक्रमहा ९० अंशातील सरळ व २८० फूट उंची असलेला सुळका