शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षेत नाशिकचे यश ; विनायक घुमरे तहसीलदार, आकाश दहाडदे उद्योग उपसंचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:41 IST

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९ च्या एकूण ४२० पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून नाशिकच्या उमेदवारांनी तहसीलदार व उद्योग उपसंचालक यांसारख्या महत्वाची पदे पादाक्रांत केली आहे.

ठळक मुद्देएमपीएसी परीक्षेत नाशिकच्या उमेदवारांचे यश विनायक घुमरे यांना तहसीलदार पद ,तर आकाश दहाडदे उद्योग उपसंचालक

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  दि.१३ ते १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९ च्या एकूण ४२० पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून नाशिकच्या उमेदवारांनी तहसीलदार व उद्योग उपसंचालक यांसारख्या महत्वाची पदे पादाक्रांत केली आहे. संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अटीच्या अधिन राहून शुक्रवारी (दि.१९) हा निकाल जाहीर करण्यात आल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या या राज्यसेवा परीक्षेत नाशिकमधील विनायक गोपीनाथ घुमरे यांनी तहसीलदार पद प्राप्त केले असून ओझर येथील आकाश राजाराम दहाडदे यांनी उद्योग उपसंचालक पद मिळविले आहे.गंगापूररोड भागातील रोषण कैलास बुवा यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी पदी तर पेठ तालुक्यातील खडकी कुमठाळे येथील  दत्ता बोरसे यांनी क्रीडा गटातून  नायब तहसीलदार पद मिळवून यश संपादन केले आहे.  राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१९ दि. १७ फेब्रुवारी, २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेकरिता ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता.  त्यातून राज्य सेवा (मुख्य) परीक्षेकरिता ६ हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.  त्यानंतर  मुख्य परीक्षा दि.१३ ते १५ जुलै  २०१९ या कालावधीत मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे येथे घेण्यात आली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी एक हजार ३२६ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.  उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी चांगले तयार होत असून त्याचाच प्रत्येय गेल्या काही दिवसांपासून लागणाऱ्या निकालांवरून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राम खैरनार यांनी व्यक्त केवी. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेतील कामगिरी पाहाता नाशिक शहर स्पर्धा परीक्षांचे हब बनू पाहत असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. 

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाNashikनाशिकTahasildarतहसीलदारStudentविद्यार्थी