वडझिरेतील रामदास ठोंबरे क्रिकेट स्पर्धेत नाशिकचा एस. अव्हेजर विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:17 IST2021-02-16T04:17:01+5:302021-02-16T04:17:01+5:30

गावातील तरुण कै.रामदास ठोंबरे याने तरुणांना संघटित करून योग्य दिशा दाखवण्याचे काम केले होत म्हणून त्याच्या नावाने ...

Nashik's S. in Ramdas Thombre Cricket Tournament in Wadzire. Average winner | वडझिरेतील रामदास ठोंबरे क्रिकेट स्पर्धेत नाशिकचा एस. अव्हेजर विजेता

वडझिरेतील रामदास ठोंबरे क्रिकेट स्पर्धेत नाशिकचा एस. अव्हेजर विजेता

गावातील तरुण कै.रामदास ठोंबरे याने तरुणांना संघटित करून योग्य दिशा दाखवण्याचे काम केले होत म्हणून त्याच्या नावाने तीन वर्षापासून रामदास चषक क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येते.

यावर्षी या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय- ३१ हजार रुपये, तर तृतीय २१ हजार रुपये ठेवण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा अव्हाड, भाजप नेते विक्रम नागरे व सुदाम बोडके यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धा अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडल्या. नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक अशोक मुर्तडक, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतन ईचम, सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप गिते, ॲडव्हान्स एन्झाईमचे संचालक किशोर राठी यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी अभि बोडके, रवि दराडे, वाल्मीक बोडके, अक्षय बोडके, संगत गायकवाड, संदीप नागरे, अंकुश गिते, अनिल बोडके, जगदीश कापसे, बाळासाहेब बोडके, सागर बोडके, सौरभ ज बोडके, ज्ञानेश्वर कापडी आदींसह तरुणांनी परिश्रम घेतले. परिसरातील क्रीडा रसिकांनी दहा दिवस स्पर्धेचा आनंद घेतला. सुरेख नियोजन व चुरशीचे सामने तसेच दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा यामुळे ही स्पर्धा परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

फोटो ओळी- विजेत्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करताना मान्यवर.

Web Title: Nashik's S. in Ramdas Thombre Cricket Tournament in Wadzire. Average winner