नाशिकच्या ‘लक्ष्मी’ लघुपटाचा अमेरिकन संस्थेकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST2021-05-20T04:16:29+5:302021-05-20T04:16:29+5:30

नाशिक : आरोग्याबाबत जनजागृती आणि स्वच्छतेच्या संदेशासह सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘लक्ष्मी’ या लघुपटाला अमेरिकन सोसायटी ऑफ सेफ्टी प्रोफेशनल ...

Nashik's 'Lakshmi' short film honored by American organization | नाशिकच्या ‘लक्ष्मी’ लघुपटाचा अमेरिकन संस्थेकडून सन्मान

नाशिकच्या ‘लक्ष्मी’ लघुपटाचा अमेरिकन संस्थेकडून सन्मान

नाशिक : आरोग्याबाबत जनजागृती आणि स्वच्छतेच्या संदेशासह सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘लक्ष्मी’ या लघुपटाला अमेरिकन सोसायटी ऑफ सेफ्टी प्रोफेशनल या नामांकित संस्थेच्या वतीने प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. नाशिकचे हौशी कलाकार आणि सुरक्षा पर्यावरण अधिकारी असलेल्या प्रसाद देशपांडे यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाने आपणास स्वतःचे आरोग्य सुरक्षित राखणे हे किती महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले आहे. आरोग्य सुरक्षित तरच आपण सुरक्षित असतो. अशा परिस्थितीत आरोग्य नेहमीच चांगले ठेवण्यासाठी आपण आपल्या घरात, परिसरात स्वच्छता ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. अन्यथा अस्वच्छतेमुळे विविध रोग पसरण्यासह आजारी पडून रुग्णालयात दाखल व्हावे लागते. अशी वेळ येऊ नये, या उद्देशाने देशपांडे यांनी लक्ष्मी नावाचा एक लघुपट तयार केला. ज्यातून स्वच्छतेचे महत्त्व दाखविले आहे. फिल्म क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचे शिक्षण आणि अनुभव नसताना केवळ हौसेपोटी ते लेखनासह सुरक्षा, पर्यावरण आणि आरोग्य, तसेच सामाजिक विषयावर लघुपट बनवीत असतात. यापूर्वी त्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी प्रथमच गंगा म्हणजे पाणी प्रदूषणावर पहिला ‘गंगा माँ का दर्द’ हा लघुपट तयार केला होता आणि त्याला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट लघुपट म्हणून सन्मानित केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक लघुपट बनविले. अनेक फिल्म महोत्सवात त्यांच्या लघुपटाला सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांच्या स्वच्छता यावर आरोग्यासाठी जनजागृती करीत असलेल्या ‘लक्ष्मी’ या लघुपटला अमेरिकन सोसायटी ऑफ सेफ्टी प्रोफेशनल या अमेरिकेतील नामांकित संस्थेच्या जागतिक स्तरावरील भारतात झालेल्या नवव्या भारतीय प्रोफेशनल डेव्हलपमेंट कॉन्फरन्समधील सुरक्षा आणि आरोग्य यावरील लघुपट स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले आहे. त्याबद्दल त्यांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना या प्रकल्पात पत्नी प्रीती देशपांडे यांची मोलाची साथ लाभली. या यशासाठी नाशिकसह राज्यातील सर्व औद्योगिक सुरक्षा अधिकाऱ्यांकडून त्यांना गौरविण्यात आले.

फोटो

२१लक्ष्मी

Web Title: Nashik's 'Lakshmi' short film honored by American organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.