आनंदवनात नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा

By Admin | Updated: April 18, 2016 00:28 IST2016-04-17T22:43:24+5:302016-04-18T00:28:06+5:30

सामाजिक बांधिलकी : कसबे सुकेणेहून एक कंटेनर द्राक्ष रवाना

Nashik's Goddess Vintage | आनंदवनात नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा

आनंदवनात नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा

कसबे सुकेणे : राज्याच्या मोठ्या शहरात किंवा लहान-मोठ्या गावात जरी द्राक्ष उपलब्ध होत असली तरी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसासारख्या दुर्गम आदिवासी भागात द्राक्ष मिळणे दुरापास्त. द्राक्ष उपलब्ध झाले तरी परिस्थितीअभावी गरीब आदिवासी ते विकत घेऊ शकत नाही. किंबहुना द्राक्ष पाहणेही त्यांना दुर्र्मीळच, या परिस्थितीचा अभ्यास करून कसबे सुकेणेतील एका मित्रमंडळ द्राक्षांची हीच अवीट गोडी गेल्या वर्षापासून आनंदवनात विनामूल्य पोहोचवण्याचे काम करीत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत कसबे सुकेणे येथील छत्रपती संभाजी महाराज कला व क्र ीडा मंडळाच्या वतीने यंदाही गडचिरोली जिल्ह्यातील आनंदवन व हेमलकसा येथे नाशिकच्या मधुर द्राक्षांचा गोडवा पोहोचवला आहे. शनिवारी सकाळी कसबे सुकेणे येथून द्राक्षांनी भरलेला एक कंटेनर गडचिरोलीकडे रवाना झाला.
स्वर्गीय माधवराव पहिलवान यांच्या प्रेरणेतून कसबे सुकेणे येथे छत्रपती संभाजी महाराज कला व क्र ीडा मंडळ कार्यरत आहे. वर्षभर कला, क्र ीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्र म राबविण्याऱ्या या मंडळाचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. मराठी चित्रपट कलाकारांकडूनही या मंडळाच्या कार्याची दरवर्षी दाखल घेतली जाते. सिनेतारका कसबे सुकेणेला उपस्थिती लावून या युवकांच्या कार्याला प्रेरणाही देतात.
सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्र म राबविणाऱ्या या मंडळाने यंदाही नाशिक तथा कसबे सुकेणे येथील द्राक्षांचा गोडवा गडचिरोलीतील आदिवासी भागातील आनंदवन व हेमलकसामधील रु ग्ण व आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवला आहे. येथील विजय अग्रो इंड्रस्टीज, नाशिक येथील विशाल ट्रान्सपोर्ट, दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथील भालेराव बंधू , कसबे सुकेणे येथील सुंदरी क्रि केट क्लब व संभाजीराजे कला, क्र ीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. यंदाचे दुसरे वर्ष आहे.
कसबे सुकेणे येथील बाळासाहेब जाधव, आनंदराव जाधव, विजय जाधव, छगन जाधव, बाळा सरोदे, अनिल सरोदे, सचिन टिपाले, भाऊराज उगले यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी २५० द्राक्ष पेट्यांनी भरलेला पहिला कंटेनर गडचिरोलीच्या दिशेने रवाना झाला असून, रविवारी दुपारी एक पथक गडचिरोलीत दाखल झाले असल्याचे समजते. येथील मंडळाने सुरू केलेल्या या उपक्र माचे लोकबिरादरीपासून ते नागपूर, नाशिकपर्यंत स्वागत होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Nashik's Goddess Vintage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.