शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

पॅरिस, नेदरलँडमधून आल्या नाशिकच्या कन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 02:03 IST

Maharashtra Assembly Election 2019 मतदान हे पवित्र कर्तव्य तर आहेच, परंतु लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. याचाच विचार करून सध्या पॅरिसमध्ये स्थायिक असलेल्या डॉ. श्रृती कपाडिया या नााशिकमध्ये आल्या आणि त्यांनी सोमवारी (दि.२१) नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदानदेखील केले.

सिडको : मतदान हे पवित्र कर्तव्य तर आहेच, परंतु लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. याचाच विचार करून सध्या पॅरिसमध्ये स्थायिक असलेल्या डॉ. श्रृती कपाडिया या नााशिकमध्ये आल्या आणि त्यांनी सोमवारी (दि.२१) नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदानदेखील केले.डॉ. कपाडिया पॅरिस येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. महाराष्टÑाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी त्यांनी खास सुटी घेतली आहे. त्या सर्व प्रथमच पॅरिसहून पुणे येथे आल्या व रविवारी (दि.२०) दुपारी नाशिकमध्ये दाखल झाल्या. डॉ. श्रृती यांचे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. पदवीचे शिक्षण बंगळुरूमध्ये झाले आहे. खुटवडनगरला त्यांचे आई-वडील वास्तव्यास आहेत. डॉ. श्रृती यांनी सकाळी कामटवाडे येथील धन्वंतरी महाविद्यालयात मतदान केले.देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनीच मतदान करणे गरजेचे आहे. आपण आज मतदान केले नाही तर पुढील पिढीला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. तसेच, आपण जागरूकतेने मतदान केल्यास पुढील पिढीदेखील मतदान करण्यासाठी नेहमी प्रवृत्त होईल. आपण निवडून दिलेला प्रतिनिधी हा आपले प्रतिनिधित्व करतो. देश बदलण्याची ताकद आपल्या एका मतामध्ये आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.विदेशात नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या नाशिककरांनीही लोकशाहीच्या या उत्सवात हिरिरीने सहभाग नोंदवला. नाशिकची कन्या असलेली पूनम लखीप्रसाद पारिक यांनी नेदरलॅँडमधील एन्डोवन या शहरातून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. पूनम पारिक या नेदरलँडमध्ये एएसएमएल कंपनीमध्ये फायनॅशिएल अ‍ॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. भारतीय लोकशाहीच्या मजबुती करणासाठी आपण नाशिकला आल्याचे पारिक यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिक