शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा शहरातील आयपीएल मॅच सट्ट्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 20:24 IST

नाशिक : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली़ शनिवारी (दि़१९) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संशयितांकडून ४० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़

ठळक मुद्देसुरगाणा : दोन संशयितांना अटक४० हजारांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली़ शनिवारी (दि़१९) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संशयितांकडून ४० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़

आयपीएल क्रिकेट मालिकेत सनरायझर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा क्रिकेट सामना सुरू होता़ या सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक करपे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पांचाळ गल्लीतील एका खोलीत छापा टाकला असता संशयित विशाल सुधाकर शिरसाठ (३३) व तुषार उल्हास आहेर (२६, दोघेही रा़ कृष्णनगर, सुरगाणा) हे साथीदारांसह आयपीएल मॅचवर लॅपटॉप व मोबाइलद्वारे लोकांकडून पैसे लावून घेऊन सट्टा खेळताना व खेळविताना आढळून आले़

पोलिसांनी या दोघा संशयितांकडून सहा मोबाइल फोन, लॅपटॉप, ७ हजार ८८० रुपये रोख, बेटिंगचे आकडे लिहिलेले रजिस्टर असा ३८ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला़ उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, हवालदार दीपक अहिरे, हनुमंत महाले, वसंत खांडवी, जालिंदर खराटे, अमोल घुगे, शिपाई हेमंत गिलबिले, संदीप लगड यांनी ही कामगिरी केली़ या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकIPL 2018आयपीएल 2018Policeपोलिसraidधाड