शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

नाशिक आरटीओतर्फे स्कूल बसचालकांसाठी उजळणी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 18:51 IST

नाशिक : शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूककरणाºया वाहन चालकांसाठी ‘विद्यार्थी सुरक्षितता व अपघातविरहित वाहतूक’ याबाबत एप्रिल व मे महिन्यात उजळणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे़ नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय व नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिल्ड्रन ट्राफिक पार्क मध्ये हे उजळणी प्रशिक्षण वर्ग होणार आहे़

ठळक मुद्देशालेय विद्यार्थी सुरक्षितता : विनामूल्य प्रशिक्षण

नाशिक : शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूककरणाºया वाहन चालकांसाठी ‘विद्यार्थी सुरक्षितता व अपघातविरहित वाहतूक’ याबाबत एप्रिल व मे महिन्यात उजळणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे़ नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय व नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिल्ड्रन ट्राफिक पार्क मध्ये हे उजळणी प्रशिक्षण वर्ग होणार आहे़शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी शासनाने स्कूल बस अधिनियम २०११ नुसार नियमावली केली आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय परिक्षेत्रात सुमारे १ हजार ८०० स्कूल बसेसला विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे परवाने देण्यात आले आहेत. सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी वाहनचालकांना नियमांची माहिती व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व नाशिक फर्स्ट संस्थेचे अनुभवी प्रशिक्षक विनामूल्य हे प्रशिक्षण देणार आहेत.एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातील सोमवारी, बुधवारी, गुरुवारी व शुक्रवारी या दिवशी सकाळी ११ ते १ व दुपारी २ ते ४ या वेळेत हे प्रशिक्षण दिले जाणार असून, सहभागी वाहनचालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील स्कूल बस, खासगी स्कूल व्हॅनचालकांना दोन तासांचे उजळणी प्रशिक्षण व समुपदेशन एप्रिल व मे महिन्यातील कोणत्याही एका दिवशी घेणे बंधनकारक आहे. यासाठी वाहनचालकांनी परवाना नूतनीकरण व वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना उजळणी प्रशिक्षण व समुपदेशन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व त्यांच्याकडील कंत्राटी स्कूल बस, परवाना प्राप्त खासगी वाहतूक करणाºया सर्व स्कूल व्हॅनचालकांनी त्यांच्या सोयीच्या दिवशी प्रशिक्षणासाठी नोंदणी करून उजळणी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा