वर्षभरात अकरा लाखांचा दंड वसूल; ८१३ केसेस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:41 PM2019-03-16T16:41:11+5:302019-03-16T16:41:41+5:30

सिडको : महापालिकेच्या सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरात रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर ...

nashik,recovery,of,eleven,lakh,rupees,year | वर्षभरात अकरा लाखांचा दंड वसूल; ८१३ केसेस दाखल

वर्षभरात अकरा लाखांचा दंड वसूल; ८१३ केसेस दाखल

Next


सिडको : महापालिकेच्या सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरात रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर करणे यांसह इतर तक्रारी मिळून आठशेहून अधिक नागरिक व व्यावसायिकांवर कारवाई करीत सुमारे अकरा लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महापालिकेच्या वतीने सिडको विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून घरपट्टी व पाणीपट्टी धडक वसुली मोहीम सुरू असून, या मोहिमेअंतर्गत थकबाकी दारांना नोटिसा तसेच मालमत्ता जप्तीपूर्वीचे वॉरंट बजाविण्यात आले आहे. या मोहिमेबरोबरच सिडकोतील घनकचरा व्यवस्थापन (आरोग्य) विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, कचरा विलिनीकरण न करणे याबरोबरच प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर करणे आदी तक्रारींबाबत दंडात्मक कारवाईची मोहीम सतत राबविली जाते. या मोहिमेत एप्रिल २०१८ ते १५ मार्च २०१९ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ११ लाख दोन हजार ४५० इतका दंड वसूल केला आहे. यात पालापाचोळा, प्लॅस्टिक व सर्व प्रकारचा कचरा जाळणाऱ्या नऊ नागरिकांवर कारवाई करीत ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच रस्त्यावर घाण करणे व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे अशा ४४४ नागरिकांवर कारवाई करीत ४ लाख ४४ हजार ७५० रुपये दंड वसूल केला आहे, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २१ नागरिकांवर कारवाई करीत चार हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच उघड्यावर लघुशंका करणाºया ५० नागरिकांवर कारवाई करीत सुमारे दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. याबरोबरच कचरा वर्गीकरण न करणाºया २०४ नागरिक व व्यावसायिकांकडून एक लाख ६८ हजार ५०० इतका दंड वसूल केला.


 

Web Title: nashik,recovery,of,eleven,lakh,rupees,year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.