शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

इंधन दरवाढीविरोधात दे धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 5:43 PM

लॉकडाऊनमुळे जनतेचे दरडोई उत्पन्न घटलेले आहे. रोजगाराची मोठी चिंता निर्माण झाली असून, उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गडगडले असतानाही भारतात मात्र इंधनाचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारचा निषेध : बहुजन मुक्ती मोर्चाचे आंदोलनदैनंदिन जीवनाश्यक वस्तूंच्या दरामध्ये सातत्याने वाढ

नाशिक : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, घरगुती सिलिंडरच्या दरात झालेली वाढ तसेच खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्याच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती मोर्चा पार्टीच्यावतीने वाहनांना धक्का मारत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी दुचाकीला धक्का मारत केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.देशात पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका उडालेला आहे. तेलाच्या किमतीदेखील २०० पार झाल्या असून, दैनंदिन जीवनाश्यक वस्तूंच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या महागाईमुळे जनता होरपळून निघत असल्याचा आरोप करीत बहुजन मुक्ती मोर्चाच्यावतीने केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धक्का मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.लॉकडाऊनमुळे जनतेचे दरडोई उत्पन्न घटलेले आहे. रोजगाराची मोठी चिंता निर्माण झाली असून, उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गडगडले असतानाही भारतात मात्र इंधनाचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. देशातील महागाई कमी करण्यासाठीची पावले उचलावीत, यासाठी बहुजन मुक्ती युवा आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्यावतीने आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.आंदोलनात ॲड. सुजाता चौदंते, सविता खैरनार, अक्षय अहिरे, सागर साळवे, राजेंद्र गायकवाड, शरद साळवे, अजय वाघ, वसंत महाले आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :NashikनाशिकPetrolपेट्रोलMorchaमोर्चा