शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पोस्टमनकडून आधार कार्डचा ‘बाजार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 18:57 IST

नाशिकरोड टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर आधार कार्ड मिळत नाहीच, शिवाय संबंधित विक्रेत्यांकडून आधार कार्डचे वीस रुपये आकारले जात असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देआधार कार्डचे वीस रुपये आकारले जात असल्याची तक्रार टपाल खात्याचे मात्र याकडे लक्ष नसल्याने आश्चर्य

नाशिक : नाशिकरोड टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर आधार कार्ड मिळत नाहीच, शिवाय संबंधित विक्रेत्यांकडून आधार कार्डचे वीस रुपये आकारले जात असल्याचे बोलले जात आहे.आधार कार्डातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने शहरात ठिकठिकाणी केंद्रे सुरू केली आहेत. ज्याच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचे काम संबंधित केंद्रांवर केले जाते. दुरुस्ती केलेले कार्ड टपालाच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळेल, असे सांगितले जाते. परंतु दुरुस्ती केल्यानंतही दोन ते तीन महिने ग्राहकांना दुरुस्ती केलेले आधार कार्ड मिळतच नसल्याचा अनेकांना अनुभव आहे. यासंदर्भात टपाल कार्यालयाकडे तक्रार करूनही ग्राहकांना अजून आधार कार्ड मिळालेले नाही. ही परिस्थिती केवळ नाशिकरोडची नव्हे तर गांधीनगर, उपनगर, अशोकामार्ग, टाकळी येथील नागरिकांची तक्रार आहे.नाशिकरोडमधील गोसावीवाडी, पवारवाडी, गुलाबवाडी, राजवाडा, देवळालीगाव परिसरातील अनेक नागरिकांना आधार कार्ड मिळाले नसल्याची तक्रार आहे. टपालचा बटवडा करणारे पोस्टमन घरोघरी दुरुस्ती केलेले आधार कार्ड वितरित करीत नसून एखाद्या दुकानात संपूर्ण परिसरातील कार्ड देऊन निघून जात असून, संबंधित दुकानदार कार्ड घेण्यासाठी येणाऱ्याकडून पैसे उकळत असल्याची तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. हा सारा गैरप्रकार होत असताना टपाल खात्याचे मात्र याकडे लक्ष नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकPostal Groundपोस्टल ग्राऊंड